देवासमधील नोटांच्या छापखान्यातून गेल्या 3 महिन्यात लाखोंची चोरी

मध्यप्रदेशातल्या देवासमध्ये चक्क नोटांच्या छपाई कारखान्यातूनच लाखोंची चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे.

देवासमधील नोटांच्या छापखान्यातून गेल्या 3 महिन्यात लाखोंची चोरी

भोपाळ : घर, दुकानं किंवा बँकांमधून पैसे चोरीच्या अऩेक घटना घडतात, मात्र मध्यप्रदेशातल्या देवासमध्ये चक्क नोटांच्या छपाई कारखान्यातूनच लाखोंची चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे. गेल्या 3 महिन्यांपासून तब्बल 90 लाखांची चोरी करण्यात आली आहे.

मागच्या 3 महिन्यांपासून नोटांच्या छपाई कारखान्यात अधिकारीपदावर असणाऱ्या पोलीस निरीक्षकानंच नोटांची बंडलं लांबवण्याचा उद्योग सुरु केला होता. आपल्या बुटामध्ये पाचशे-पाचशे रुपयांची बंडलं लपवून त्याने हा काळाबाजार सुरु केला. मनोहर वर्मा असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्यानं त्याची तपासणी होत नव्हती, याचाच फायदा घेऊन मागच्या 3 महिन्यात मनोहर वर्मानं तब्बल 90 लाख रुपये चोरल्याची माहिती आहे. काल शुक्रवारी त्याला रंगेहाथ पकडलं गेलं. नोटांची पडताळणी करुन त्या कायम ठेवणं किंवा त्यांना रद्द करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर होती.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 90 lacs theft in devas currency printing press in mp latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV