'10 रुपयाची नाणी बिनधास्त स्वीकारा', थेट आरबीआयचा मेसेज!

'रुपयाचं चिन्ह असलेले आणि नसलेले अशी दोन्ही प्रकारची दहा रुपयांची नाणी वैध आहेत. त्यामुळे कोणतीही काळजी न करता ही नाणी स्वीकारा.'

'10 रुपयाची नाणी बिनधास्त स्वीकारा', थेट आरबीआयचा मेसेज!

मुंबई : 10 रुपयांची सर्व नाणी वैध असल्याचं काही दिवसांपूर्वीच रिझर्व बँकेने स्पष्ट केलं आहे. मात्र, अद्यापही अनेक जण 10 रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याचं आरबीआयच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता आरबीआयने यासंबंधी थेट मोबाईलवर मेसेज पाठवणं सुरु केलं आहे.

रुपयाचं चिन्ह असलेले आणि नसलेले अशी दोन्ही पद्धतीची 10 रुपयाची नाणी वैध आहेत असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.

आरबीआयचा नेमका मेसेज का?

'रुपयाचं चिन्ह असलेले आणि नसलेले अशी दोन्ही प्रकारची दहा रुपयांची नाणी वैध आहेत. त्यामुळे कोणतीही काळजी न करता ही नाणी स्वीकारा. तसंच यासंबंधी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास आरबीआयच्या 14440 या क्रमांकावर मिस कॉल द्या.' असं आरबीआयने पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

27591804_1978814628800904_1679429479_n

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आरबीआयने यासंबंधी एक निवेदनही जारी केलं होतं. '10 रुपयांची सर्व नाणी वैध असून स्वीकारण्यायोग्य आहेत. त्यामुळे या नाणांच्या माध्यमातून व्यवहार होऊ शकतो.' असं त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं.

आरबीआयने वेळोवेळी वेगवेगळ्या डिझाईनची नाणी चलनात आणली आहेत. त्यामुळे ही सर्व नाणी वैध आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: accept 10 Rupee coin without fear RBI message latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV