माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन

नोटाबंदी करुन चूक केल्याचं पंतप्रधानांनी मान्य केल्यास, मी त्यांना सलाम करेन, असे कमल हसन यांनी म्हटले.

माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन

तामिळनाडू : मोदी सरकारच्या नोटाबंदीची स्तुती करणाऱ्या अभिनेता कमल हसन यांनी आता यू-टर्न घेतला आहे. नोटाबंदीचं समर्थन केल्याबद्दल कमल हसन यांनी माफीही मागितली आहे.

तमिळ मासिकात कमल हसन एक कॉलम लिहितात. त्या कॉलममध्ये त्यांनी नोटाबंदीसंदर्भात मत मांडलं आहे.

नोटाबंदी करुन चूक केल्याचं पंतप्रधानांनी मान्य केल्यास, मी त्यांना सलाम करेन, असे कमल हसन यांनी म्हटले.

मोदींनी ज्यावेळी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता, त्यावेळी कमल हसन यांनी त्या निर्णयाची स्तुती करुन म्हटलं होतं, "मिस्टर मोदींना सलाम! सर्व राजकीय विचारधारांना बाजूला सारुन या निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे."

दोन महिन्यांआधीच कमल हसन यांनी राजकीय प्रवेशाबाबत सकारात्मक मत व्यक्त केले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेटही घेतली होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. त्याचवेळी आता कमल हसन यांनी पुन्हा एकदा राजकीय टीका करुन एकप्रकारे राजकारणातील आपला रस व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी म्हणजे 2016 च्या 8 नोव्हेंबरला मोदी सरकारने नोटाबंदी जाहीर केली आणि 500, 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. या निर्णयावर टीकाही झाली आणि कौतुकही झालं. त्यावेळी कमल हसन यांनी कौतुक केलं होतं, तर आता तेच कमल हसन टीका करु लागले आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV