जया बच्चन पुन्हा समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवार

जया बच्चन यांनी उत्तर प्रदेशातून समाजवादी पक्षातर्फे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज केला.

जया बच्चन पुन्हा समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवार

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन समाजवादी पक्षाकडूनच राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील जागेवरुन जया यांचं नामांकन करण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यांना छेद देत जया बच्चन यांनी उत्तर प्रदेशातून सपातर्फे उमेदवारी अर्ज केला.

जया बच्चन 2004 मध्ये समाजवादी पक्षाकडून पहिल्यांदा उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आल्या. सध्या त्या तिसऱ्यांदा खासदारपदी नियुक्त झाल्या आहेत. जया बच्चन यांची तिसरी टर्म 3 एप्रिल 2018 रोजी संपणार आहे. त्यामुळे खासदारपदी नियुक्त झाल्यास त्या सलग चौथ्यांदा खासदारकी भूषवतील.

16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे.

23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार

वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी

डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी

रजनी पाटील  - काँग्रेस

अनिल देसाई  - शिवसेना

राजीव शुक्ला - काँग्रेस

अजयकुमार संचेती - भाजप

केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

कोणत्या पक्षाचे किती खासदार?

भाजप -17

काँग्रेस - 12

समाजवादी पक्ष - 6

जदयू - 3

तृणमूल कॉंग्रेस - 3

तेलुगू देसम पक्ष - 2

राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2

बीजद - 2

बसप - 1

शिवसेना - 1

माकप - 1

अपक्ष  - 1

राष्ट्रपती नियुक्‍त - 3

संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

कोणत्या राज्यातील किती जागा?

आंध्र प्रदेश - 3

बिहार - 6

छत्तीसगड - 1

गुजरात - 4

हरियाणा - 1

हिमाचल प्रदेश - 1

कर्नाटक - 4

मध्य प्रदेश - 5

महाराष्ट्र - 6

तेलंगणा - 3

उत्तर प्रदेश - 10

उत्तराखंड - 1

पश्चिम बंगाल - 5

ओदिशा - 3

राजस्थान - 3

झारखंड - 2

याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे.

संबंधित बातम्या


राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक


राज्यसभा निवडणूक : शिवसेनेकडून अनिल देसाईंना पुन्हा संधी


जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी?

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actress Jaya Bachchan to be Samajwadi Party Candidate for Rajya Sabha Poll latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV