श्रीदेवींच्या मृत्यूने धक्का, मला जगावंसं वाटत नाहीय : राखी सावंत

राखी सावंतने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आपल्या भावना व्यक्त करताना राखी सावंत रडतानाही दिसते आहे.

श्रीदेवींच्या मृत्यूने धक्का, मला जगावंसं वाटत नाहीय : राखी सावंत

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने सिनेसृष्टीसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनयाने श्रीदेवी यांनी सगळ्यांनाच भुरळ पाडली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अभिनेत्री राखी सावंत हिने व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“श्रीदेवी मॅम, तुमच्या निधनाने मला प्रचंड दु:ख झालं आहे. तुमच्यासारखे कुणीच नाही. तुमच्यासारखं कुणी डान्स करु शकत नाही किंवा अभिनयही करु शकत नाही. आता तर मला जिवंत राहावसं वाटत नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.”, अशा भावना राखी सावंतने व्यक्त केल्या.

राखी सावंतने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आपल्या भावना व्यक्त करताना राखी सावंत रडतानाही दिसते आहे.

शनिवारी (24 फेब्रुवारी) रात्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. त्या 54 वर्षांच्या होत्या. आपल्या अभिनयाने त्यांनी असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.


भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actress Rakhi Sawant cried due to the death of Sridevi latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV