VIDEO: पेट्रोलचं व्यसन लागलेलं माकड

माकडांच्या वेगवेगळ्या कला किंवा त्यांनी केलेल्या अनेक खोड्या आपण पाहिल्या आहेत.

VIDEO: पेट्रोलचं व्यसन लागलेलं माकड

नवी दिल्ली:  माकडांच्या वेगवेगळ्या कला  किंवा त्यांनी केलेल्या अनेक खोड्या आपण पाहिल्या आहेत. मात्र हरियाणातील पानिपतमधील एक माकड अजबच आहे.

तहान लागल्यानंतर हे माकड पाणी नाही तर थेट पेट्रोल पितं. या माकडाला चक्क पेट्रोल पिण्याचं व्यसन लागलं आहे.

पानिपत परिसरात पार्किंगला लावलेल्या बाईकमधील पेट्रोल दररोज गायब होत होतं. याबाबत वाहनचालकांनी अधिक चौकशी केली असता, त्यांना आश्चर्यकारक चित्र दिसलं.

एक माकड चक्क पेट्रोलची पाईप काढून थेट पेट्रोल पित असल्याचं दिसलं.

या माकडाच्या सवईबाबत स्थानिकांनी अधिक माहिती घेतली असता, हे माकड नेहमीच गाड्यांमधील पेट्रोल पित असल्याचं समजलं. हे माकड अन्य माकडांप्रमाणे शेंगा किंवा अन्य फळं खात नाही, पण पेट्रोल पितं.

पानिपतमधील इंसार बाजारपेठेत हे माकड आहे. इथे कोणती गाडी आली, की लगेच हे माकड खाली उतरुन, पेट्रोलची पाईप काढतं आणि थेट तोंडाला लावतं.

https://twitter.com/abpmajhatv/status/929953935359479809

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Addict monkey steals and DRINKS petrol from bikes in India
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV