VIDEO : गुजरातमधील मंत्र्यांवर आदिवासींनी अंडी फेकली!

बिलिस्तान टायगर ही गुजरातमधल्या आदिवासींची संघटना आहे.

VIDEO : गुजरातमधील मंत्र्यांवर आदिवासींनी अंडी फेकली!

सुरत : गुजरात सरकारमधील मंत्र्यांच्या भाषणा दरम्यान अंडी फेकण्यात आल्याची घटना सुरतमध्ये घडली. बिलिस्तान टायगर या आदिवासींच्या संघटनेने मंत्र्यांवर अंडी फेकली.

भाजपनं आयोजित केलेल्या गुजरात गौरव यात्रेदरम्यान मंत्री गणपत वासावा भाषण करत होते. यावेळी बिलिस्तान टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी अंडी फेकली. सुदैवानं अंडी मंत्र्यांना न लागता स्टेजवरच पडली.

यावेळी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अंडी फेकणाऱ्यांना मारहाण केली.

बिलिस्तान टायगर ही गुजरातमधल्या आदिवासींची संघटना आहे. सरकारनं आदिवासी क्षेत्रात विकास न केल्याचा या संघटनेचा आरोप आहे.

पाहा बातमीचा व्हिडीओ :

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV