VIDEO : काश्मीरमध्ये धोनीसमोर आफ्रिदीच्या नावाची घोषणाबाजी

काश्मीरमध्ये धोनीनं एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही तरुणांनी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावाच्या घोषणा दिल्या.

VIDEO : काश्मीरमध्ये धोनीसमोर आफ्रिदीच्या नावाची घोषणाबाजी

जम्मू-काश्मीर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काश्मीर दौऱ्यावर गेला असताना त्याच्यासमोर ‘आफ्रिदी, आफ्रिदी’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. धोनींनं लष्करी छावण्या, स्कूल परिसरातील नागरिकांची भेट घेतली.

काश्मीरमध्ये धोनीनं एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही तरुणांनी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावाच्या घोषणा दिल्या. दरम्यान, घोषणाबाजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘क्रिकेटमुळे दोन्ही देशात चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. पण यासाठी, सरकारच्या हस्तक्षेप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय दोन्ही देशातील क्रिकेटसंबंध सुरळीत होऊ शकत नाही’ असंही धोनी यावेळी म्हणाला.

यावेळी धोनीनं बारामुल्ला जिल्हातील युवकांशी देखील संवाद साधला. तरुणांनी तंदुरुस्तीवर भर द्यावा युवकांनी तंदुरुस्तीवर भर द्यावा हे सांगताना त्यांने युवांना काही टिप्स देखील दिल्या होत्या.

VIDEO :

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Afridi’s sloganeering in front of Dhoni in Kashmir latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV