फक्त 99 रुपयात विमान प्रवास, एअर एशियाची ऑफर

बंगळुरु, हैदराबाद, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांची या सात शहरांमध्ये एअर एशियाच्या विमानाने प्रवास करायचा असल्यास 99 रुपयांपासून प्रमोशनल तिकीटदर सुरु होणार आहेत.

फक्त 99 रुपयात विमान प्रवास, एअर एशियाची ऑफर

मुंबई : 'एअर एशिया इंडिया' या लो-कॉस्ट एअरलाईनने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. प्रवाशांना सात देशांतर्गत मार्गांवर केवळ 99 रुपयांच्या प्रमोशनल बेस फेअरवर प्रवास करता येणार आहे.

बंगळुरु, हैदराबाद, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांची या सात शहरांमध्ये एअर एशियाच्या विमानाने प्रवास करायचा असल्यास 99 रुपयांपासून प्रमोशनल तिकीटदर सुरु होणार आहेत. सोमवारपासून ही ऑफर सुरु झाली असून 21 जानेवारीपर्यंत तिकीट बुक करता येणार आहे.

15 जानेवारी ते 31 जुलै 2018 या कालावधीतील विमान प्रवासाचं बुकिंग तुम्हाला करता येणार आहे. airasia.com या अधिकृत संकेतस्थळावरुन आणि एअरएशिया मोबाईल अॅपवरुन बुकिंग केलं, तरच डिस्काऊंटचा लाभ घेता येणार आहे.

'एअर एशिया'च्या विमानाने भारतातून निवडक 10 देशांमध्ये प्रवास करायचा असल्यास त्यावरही सूट मिळणार आहे. ऑकलंड, बाली, बँगकॉक, क्वाला लंपूर, मेलबर्न, सिंगापूर आणि सिडनी या एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशात केवळ 1 हजार 499 रुपयांच्या बेस फेअरमध्ये प्रवास करता येणार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Air Asia offers tickets to 7 cities starting at Rs 99 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV