एअर इंडियाच्या विमानांमध्ये लवकरच वाय-फाय !

एअर इंडियाच्या विमानांमध्ये लवकरच वाय-फाय !

नवी दिल्ली : येत्या काही दिवसात तुम्ही विमानातूनही मेल किंवा चॅटिंग करु शकता. एअर इंडिया देशांतर्गत विमानांमध्ये वायफाय सेवा उपलब्ध करुन देण्याचा विचार करत आहे. एअर इंडियाच्या 'ए-320' या विमानातून याची सुरुवात केली जाणार आहे. एअर इंडियाने अशाप्रकारे वायफाय सुरु केल्यास, विमानात वायफाय पुरवणारी एअर इंडिया देशातील पहिली विमान कंपनी ठरणार आहे.

"आम्ही आमच्या विमानांमध्ये वायफाय सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. विमान बनवणाऱ्या कंपनीकडून सुरक्षिततेबाबत हिरवा कंदिल मिळाला की सेवा सुरु केली जाईल. वायफाय विमानात कशाप्रकारे सुरु करता येईल, यावर विमान बनवणाऱ्या एअरक्राफ्ट उत्पादकांशी चर्चा सुरु आहे. नेमकी तारीख सांगणं कठीण आहे, पण जून किंवा जुलैपर्यंत देशांतर्गत विमानांमध्ये वायफाय सेवा सुरु केली जाईल.", अशी माहिती एअर इंडियाचे प्रमुख अश्विनी लोहानी यांनी सांगितले.

विमानांमधील वाय-फायला किती स्पीड असेल आणि प्रवाशांना किती डेटा वापरण्याची मर्यादा असेल, याबाबत अधिक स्पष्टीकरण एअर इंडियाकडून देण्यात आले नाही.

एअर इंडिया सुरुवातीला मोफत वायफाय देण्याची शक्यता आहे. मात्र, विशिष्ट अवधीनंतर या सेवेसाठी पेसे आकारण्याची शक्यताही आहे. मोफत वायफायमध्येही इमेल चेक करणं, पाठवणं,व्हॉट्सअॅप यांचा समावेश असू शकतो. इमेल, व्हॉट्सअॅपसोबत आणखी कोणत्या गोष्टींसाठी वायफाय सेवेचा लाभ घेता येईल, हे एअर इंडियाकडून अधिकृत सांगण्यात आले नाही.

देशांतर्गत विमानसेवेत वायफाय सेवेला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून या सेवाचा पुढे विस्तार केला जाणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेतही वायफाय देण्यावर विचार केला जाईल.

गल्फ कॅरियर आपल्या प्रवाशांसाठी 10 एमबी मोफत इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देते. इमेल चेक करणं, पाठवण किंवा फेसबुक, व्हॉट्सअॅप अपडेट करण्यासाठी इतका डेटा पुरेसा असतो. विशेषम्हणजे, प्रवाशांना 10 एमबीपेक्षा अधिक इंटरनेट डेटा हवा असल्यास, प्रवाशी अधिकचे पैसे मोजून सेवेचा लाभ घेऊ शकतात.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV