इंडिगो मारहाण प्रकरणानंतर एअर इंडियाची कल्पक कुरघोडी

'आम्ही फक्त नमस्ते म्हणण्यासाठीच हात उचलतो' अशा कॅप्शनसह एअर इंडियाने त्यांचा मॅस्कॉट 'महाराजा'चा फोटो ट्विटर, इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

By: | Last Updated: 08 Nov 2017 09:42 PM
इंडिगो मारहाण प्रकरणानंतर एअर इंडियाची कल्पक कुरघोडी

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर प्रतिस्पर्धी कंपन्यांनी कल्पक कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीने या संधीचा फायदा उचलत क्रिएटिव्ह ट्वीट्स केले आहेत.

'आम्ही फक्त नमस्ते म्हणण्यासाठीच हात उचलतो' अशा कॅप्शनसह एअर इंडियाने त्यांचा मॅस्कॉट 'महाराजा'चा फोटो ट्विटर, इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तर 'अनबीटेबल सर्व्हिस' या दुसऱ्या फोटोतूनही इंडिगोवर निशाणा साधला आहे.

Air India ad

https://twitter.com/airindiain/status/928257008368697344

आम्ही फक्त आमची खासियत सांगत आहोत, सध्याच्या घडामोडींशी काही संबंध आढळल्यास योगायोग समजावा, असं एअर इंडियाच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे.

Jet Airways ad

जेट एअरवेजने मात्र त्यांच्या नावे पसरणाऱ्या जाहिरातीचं समर्थन केलेलं नाही. जेटने ट्वीट करुन तसं स्पष्टीकरण दिलं आहे.

https://twitter.com/jetairways/status/928181103491346432

इंडिगो आणि एअर इंडियामधील वाद नवा नाही. गेल्या वर्षी एअर इंडियाने कोणाचंही नाव न घेता 'पुढच्या वेळी एअर इंडियाने प्रवास करा आणि फरक अनुभवा' अशी जाहिरात केली होती. त्यावर इंडिगोने थेट निशाणा साधला. 'होय एअर इंडिया. फरक तर आहेच. आणि सरकारनेच तसं सांगितलं आहे' असा उल्लेख इंडिगोच्या जाहिरातीत होता.

प्रवाशाला मारहाण करणाऱ्या इंडिगो कर्मचाऱ्याची हकालपट्टी


डीजीसीएच्या गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार इंडिगोबाबत प्रवाशांच्या सर्वात कमी, तर एअर इंडियाबाबत सर्वाधिक तक्रारी होत्या.

इंडिगो प्रवाशांना मारहाण प्रकरण काय आहे?

इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याने दिल्ली विमानतळावर प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर इंडिगोने माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

इंडिगोचा ग्राऊंड स्टाफ आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला. याचं रुपांतर हाणामारीत झालं. या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता. 15 ऑक्टोबर रोजी घडलेली ही घटना आहे. राजीव कतियाल हे बसची वाट पाहत उभे होते, तेव्हा ही घटना घडली.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Air India makes a pun at IndiGo airlines over manhandling passengers incident latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV