केवळ 312 रुपयात विमान प्रवास, GoAir ची ऑफर

कंपनीने दिल्ली, कोची आणि बंगळुरुसह सात शहरांसाठीचं विमान तिकीट 312 रुपयांपासून ठेवलं आहे.

केवळ 312 रुपयात विमान प्रवास, GoAir ची ऑफर

नवी दिल्ली : तुम्हाला विमान प्रवास करायचा असेल तर ही चांगली संधी ठरु शकते. देशांतर्गत विमान कंपनी गो एअरने स्वस्त विमान प्रवासाची संधी दिली आहे. कंपनीने दिल्ली, कोची आणि बंगळुरुसह सात शहरांसाठीचं विमान तिकीट 312 रुपयांपासून ठेवलं आहे.

या ऑफरनुसार तिकीट बुकिंग 24 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या काळात सुरु राहिल. या तिकिटांवर 1 डिसेंबर 2017 ते 28 ऑक्टोबर 2018 या दरम्यान कधीही प्रवास करता येईल. अगोदर येईल, त्याला तिकीट, या आधारावर बुकिंग सुरु आहे.

मुंबईतील कंपनीच्या मुख्यालयाबाहेर ही तिकीट बुकिंग सुरु आहे. या तिकिटामध्ये कराचा समावेश करण्यात आलेला नाही. ही विशेष ऑफर दिल्ली, कोची, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद आणि लखनौ या मार्गांवर उपलब्ध आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: air travel in just rupees 312 go air offers tickets
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV