अधिकार नसूनही ईडीकडून छापेमारी: चिदंबरम

एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात अनियमितता आढळल्याने ईडीनं दिल्ली आणि चैन्नईतल्या 5 संपत्तीवर ही छापेमारी केली.

अधिकार नसूनही ईडीकडून छापेमारी: चिदंबरम

नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति यांच्या 5 घरांवर आज सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.

महत्वाची बाब म्हणजे यावेळी कार्ती यांचे वडील आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम घरी उपस्थित होते.

एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात अनियमितता आढळल्याने ईडीनं दिल्ली आणि चैन्नईतल्या 5 संपत्तीवर ही छापेमारी केली.

याआधीही ईडीनं कार्ति चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चैन्नईतल्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.त्यानंतर आज सकाळीच पुन्ही ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या छाप्यात ईडीच्या हाती काही लागलं नसल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय. सूडभावनेतून ही कारवाई होत असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.

पैशाच्या अफरातफरीचा आरोप आहे आणि या आरोपांमध्ये ईडीने धाडी टाकणं याचा काहीही संबंध नाही. पण तरीही छापेमारी होत आहे. तसंच जोरबागमध्ये जो बंगला आहे तो कार्तिचा नाही तर माझा आहे, असं चिदंबरम म्हणाले.

तसंच घरातील किचन, ड्रॉईंग रुमसह सर्व घराची झाडाझडती घेतली, तरीही ईडीला काहीही मिळालं नाही, असं त्यांनी सांगितलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aircel-Maxis case: P.Chidambaram speaks on ED searches at son Karti’s Delhi & Chennai residences
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV