आखाडा परिषदेकडून देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर

आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या यादीमध्ये राधे मा, आसाराम बापू आणि राम रहीम यांसारख्या भोंदू बाबांचे नावं आहेत. ही यादी सरकारला सोपवली जाणार आहे.

आखाडा परिषदेकडून देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर

अलाहाबाद : अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. अलाहाबादमध्ये आखाडा परिषदेची बैठक झाली. बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी अशा बाबांची यादी जारी केली, ज्यांच्याकडून धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जाते.

राधे मा, आसाराम बापू आणि राम रहीम यांसारख्या भोंदू बाबांचे यामध्ये नावं आहेत. ही यादी सरकारला सोपवली जाणार आहे. जेणे करुन लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या या भोंदू बाबांवर कारवाई केली जाईल.

ते 14 भोंदू बाबा कोण?

 1. आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी

 2. सुखविंदर कौर उर्फ राधे मां

 3. नारायण साई

 4. गुरमीत राम रहीम सिंह

 5. स्वामी असीमानंद

 6. ओम नमः शिवाय बाबा

 7. सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता

 8. ओमबाबा उर्फ विवेकानंद झा

 9. निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह

 10. इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ती द्विवेदी

 11. रामपाल

 12. आचार्य कुशमुनी

 13. वृहस्पती गिरी

 14. मलखान सिंह


संत उपाधी देण्याबाबतही निर्णय

आखाडा परिषदेने संत ही उपाधी देण्याबाबत एक ठराविक प्रक्रिया निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता संबंधित व्यक्तीची पडताळणी करुन त्याचं आकलन केल्यानंतरच संत ही उपाधी बहाल केली जाईल.

दरम्यान या बैठकीपूर्वी नरेंद्र गिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. बैठकीपूर्वी एक दिवस फोनवरुन ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणारा व्यक्ती आपण आसाराम बापूचा शिष्य असल्याचं सांगत आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV