उत्तरप्रदेशातल्या मदरशांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक

राष्ट्रगीत हे जात, धर्म आणि भाषाभेदांपलिकडचे असल्याचं सांगत हायकोर्टानं मदरशांकडून घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले.

उत्तरप्रदेशातल्या मदरशांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक

अलाहाबाद : यूपीच्या मदरशांमध्ये यापुढे राष्ट्रगीत अनिवार्य करण्यावर हायकोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा निर्णय दिला.

या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना अलाहाबाद हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे. मदरशांना राष्ट्रगीत गाण्यापासून सूट मिळणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं. राष्ट्रगीत हे जात, धर्म आणि भाषाभेदांपलिकडचे असल्याचं सांगत हायकोर्टानं मदरशांकडून घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले.

राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान असंवैधानिक कर्तव्य आहे असे हायकोर्टाने पुढे म्हटले आहे. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर आता मदरशांसाठी राष्ट्रगीत बंधनकारक झाले आहे.

यापूर्वी १५ ऑगस्टला मदरशांमध्ये ध्वजारोहण आणि तिरंग फडकावण्याचा कार्यक्रम आयोजित करावा आणि त्याचे चित्रिकरणही करावे असे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी मुस्लीम संघटनांनी उत्तर प्रदेश सरकारवर मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय निर्माण केला जात असल्याचा आरोप केला होता.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV