भारतीय लष्कराच्या ताफ्यात नव्या M-777 तोफा दाखल

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 18 May 2017 9:52 PM
भारतीय लष्कराच्या ताफ्यात नव्या M-777 तोफा दाखल

नवी दिल्ली : भारतीय लष्करासाठी अमेरिकन बनावटीच्या M-777 तोफा आज भारतात दाखल झाल्या. तब्बल 30 वर्षांनंतर लष्कराच्या ताफ्यात अशाप्रकारच्या परदेशी बनावटीच्या तोफा दाखल झाल्या आहेत.

80 च्या दशकात भारतीय सैन्यदलात स्वीडनच्या बोफर्स तोफा दाखल झाल्या. पण या तोफा खरेदीतील दलालीच्या आरोपांमुळे यानंतर तोफा खरेदी करण्यात आल्या नव्हत्या. पण आता अमेरिकन बनावटीच्या M-777 या नव्या तोफा सैन्य दलाच्या ताफ्यात दाखल झाल्याने, सैन्य दलाची ताकद वाढली आहे.

आज दुपारी 2 च्या सुमारास या नव्या तोफा राजधानी दिल्लीत दाखल झाल्या. कस्टम विभागाच्या कार्यवाहीनंतर या तोफा दिल्ली कॅन्टहून राजस्थानच्या पोखरण फायरिंग रेंजकडे पाठवण्यात आल्या. या तोफा पोखरणमध्ये दाखल झाल्यानंतर त्यातून मारा करुन तपासणी केली जाईल.

या तोफांची निर्मिती अमेरिकेच्या BSE सिस्टिम कंपनीनं केली आहे. या तोफा भारतात दाखल झाल्यानंतर 145 M-777 अल्ट्रा लाईट हेवित्झरच्या करारानुसार, दोन तोफा वेळेअधीच भारतीय सैन्य दलाला पुरवल्याचं कंपननीनं स्पष्ट केलं. तसेच भारतीय सैन्य दलाचं आर्टिलरी गनच्या माध्यमातून अत्याधुनिकरण करण्यास आवश्यक ते सर्व सहकार्य करु असंही कंपनीनं यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, भारताने गेल्या वर्षीच अमेरिकेच्या BSE कंपनीसोबत तोफांच्या खरेदीसाठी करार केला होता. या करारानुसार,155x 39 क्षमतेच्या 25 तोफा कंपनी भारताला अमेरिकेतून पुरवण्यात येणार आहेत. तर 120 तोफा भारतात असेम्बल करण्यात येणार आहेत. या व्यवहारासाठी भारताने BSE ला 2900 कोटी रुपये दिले आहेत.

या 120 तोफा असेम्बल करण्यासाठी BSE ने महिंद्रा कंपनीशी करार केला आहे. या तोफांची क्षमता 24 ते 40 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची आहे.

First Published: Thursday, 18 May 2017 9:51 PM

Related Stories

‘बिग बॉस’फेम स्वामी ओम बाबांना दिल्लीत मारहाण
‘बिग बॉस’फेम स्वामी ओम बाबांना...

नवी दिल्ली : ‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम

तयार राहा, कधीही बोलावलं जाईल, वायुदल प्रमुखांचे 1200 अधिकाऱ्यांना पत्र
तयार राहा, कधीही बोलावलं जाईल, वायुदल...

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाचे प्रमुख बी एस धनोआ यांनी 1200

LoC वर सुरुंग स्फोट, एक जवान जखमी
LoC वर सुरुंग स्फोट, एक जवान जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील एलओसीवरील सुरुंग स्फोटात एक जवान जखमी

ईव्हीएमशी छेडछाड अशक्य, निवडणूक आयोगाचा डेमोसह दावा
ईव्हीएमशी छेडछाड अशक्य, निवडणूक...

नवी दिल्ली : ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा निवडणूक

तो पाकिस्तानी वकील, जो हरीश साळवेंसमोर टिकलाच नाही!
तो पाकिस्तानी वकील, जो हरीश...

हेग (नेदरलँड): आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानी जेलमध्ये बंद

23 वर्षीय तरुणीने बलात्कारी साधूचं गुप्तांग कापलं!
23 वर्षीय तरुणीने बलात्कारी साधूचं...

तिरुअनंतपूरम (केरळ) : अनेक वर्षांपासून सातत्याने बलात्कार करणाऱ्या

मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!
मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22...

मुंबई : भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस

GST मुळे काय महाग, काय स्वस्त?
GST मुळे काय महाग, काय स्वस्त?

श्रीनगर : वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीअंतर्गत बहुतांश

उत्तराखंडमध्ये दरड कोसळली, औरंगाबादच्या 102 भाविकांसह 15 हजार जण अडकले
उत्तराखंडमध्ये दरड कोसळली,...

देहरादून: उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास

उत्तराखंडमध्ये भूस्खलन, महाराष्ट्रातील 179 भाविक अडकून
उत्तराखंडमध्ये भूस्खलन,...

बद्रीनाथ/उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन