राधे माँकडून भक्तांना प्रसाद म्हणून उष्ट्या चॉकलेटचं वाटप

स्वंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. इंदूरमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या राधे माँने प्रसाद म्हणून स्वतःचं उष्टं चॉकलेट भक्तांना खायला दिलं.

राधे माँकडून भक्तांना प्रसाद म्हणून उष्ट्या चॉकलेटचं वाटप

भोपाळ : स्वंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. इंदूरमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या राधे माँने प्रसाद म्हणून स्वतःचं उष्टं चॉकलेट भक्तांना खायला दिलं.

बग्गीवरुन आपल्या नेहमीच्या शैलीत सजून आलेल्या राधे माँने इथे सुद्धा आपल्या विचित्र नृत्याचा नजारा भक्तांना दाखवला. अखेरीस जयजयकारात गुंग असलेल्या भक्तांना गुंगारा देवून, काही वेळातच राधे माँ इथून तब्येतीचं कारण देत गायब झाली.

दरम्यान, अशा ढोंगी गुरूंना अद्यापही लोकाश्रय मिळतोय आणि त्यांच्यावर नोटांचा पाऊस पाडला जातोय हे समाजातलं दुर्दैवी वास्तव आहे.

व्हिडीओ पाहा

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Another video of controversial woman Radhe Maa has come to light from Indore
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV