VIDEO: अपर्णा यादव यांचा घुमर गाण्यावर डान्स

या व्हिडीओमध्ये अपर्णा यादव ‘पद्मावती’च्या लूकमध्ये घुमर गाण्यावर डान्स करत आहेत.

VIDEO: अपर्णा यादव यांचा घुमर गाण्यावर डान्स

लखनऊ: समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. अपर्णा यादव या पद्मावती सिनेमातील घुमर या गाण्यावर डान्स करताना, या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत.

अपर्णा यांचा भाऊन अमन बिष्ट यांच्या साखरपुड्यातील हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. याच कार्यक्रमात अपर्णा यांनी हा डान्स केल्याचं सांगितलं जात आहे.

या व्हिडीओमध्ये अपर्णा यादव ‘पद्मावती’च्या लूकमध्ये घुमर गाण्यावर डान्स करत आहेत.

सध्या हा व्हिडीओ यूट्यूबसह व्हॉट्सअप, फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल होत आहे. अनेकांनी अपर्णा यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे, तर राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.

दरम्यान, पद्मावती सिनेमावरुन सध्या वाद सुरु आहे. या सिनेमातील घुमर गाण्यावरुनही वादाला सुरुवात झाली. करणी सेना आणि राजस्थानातील राजघराण्यांनी या सिनेमावर आक्षेप घेतला आहे. इतिहासाची मोडतोड करुन हा सिनेमा बनवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/935792835491532800

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aparna Yadav,daughter in law of Mulayam Singh Yadav performs on the ‘Ghoomar’ song of Padmavati at a function in Lucknow
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV