राष्ट्रपतींच्या उद्गारांनी कलेचं चीज, चित्रकार महेश लाड कृतकृत्य

घटनात्मक दृष्टीनं देशात सर्वोच्च प्रतिष्ठा असलेल्या वास्तूत त्यामुळे पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांचं तैलचित्र लागणार आहे

राष्ट्रपतींच्या उद्गारांनी कलेचं चीज, चित्रकार महेश लाड कृतकृत्य

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या उद्गागारांनी माझ्या कलेचं चीज झालं. आमचे पूर्वज महाराजांच्या दरबारी होते, आज आपल्यालाही तो मान मिळाला, केवळ या एका भावनेनं आमचं सगळं कुटुंब समाधानी आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिलेल्या शिवरायांच्या प्रतिमेचे चित्रकार महेश लाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शिवरायांच्या या प्रतिमेनं राष्ट्रपती भवनात जी कमतरता जाणवत होती, ती पूर्ण झाली, असे भावनिक उद्गार काल राष्ट्रपतींनी दिल्लीतल्या भव्य शिवजयंती सोहळ्यात काढलेले होते. या सोहळ्यात शिवरायांची भव्य प्रतिमा भेट दिल्यानंतर कृतार्थतेनं त्यांनी या भावना व्यक्त केल्या होत्या. अतिशय उच्च प्रतीचं हे तैलचित्र राष्ट्रपती भवनाची शोभा वाढवत राहील, असेही राष्ट्रपती म्हणाले होते.

घटनात्मक दृष्टीनं देशात सर्वोच्च प्रतिष्ठा असलेल्या वास्तूत त्यामुळे पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांचं तैलचित्र लागणार आहे. हे तैलचित्र ज्या कलाकाराच्या हातून साकार झालं, त्या महेश लाड यांच्याशी 'एबीपी माझा'नं एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.

शिवरायांच्या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनातील कमतरता पूर्ण : कोविंद


"राष्ट्रपतींच्या या उद्गागारांनी माझ्या कलेचं चीज झालं. आमचे पूर्वज महाराजांच्या दरबारी होते, आज आपल्यालाही तो मान मिळाला या केवळ एका भावनेनं आमचं सगळं कुटुंब समाधानी आहे" अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रपतींसाठी चित्र बनवायला सांगितलं, यापेक्षा जे चित्र बनवत आहोत, ते महाराजांचं आहे, याच भावनेनं आनंदून गेलो होतो असं लाड यांनी म्हटलं.

राष्ट्रपतींना भेट द्यायचंय म्हटल्यावर त्या चित्राच्या सत्यतेवर भर देणं भाग होते. त्याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केल्यानंतर ब्रिटीश लायब्ररीमध्ये महाराजांचे जे एकमेव पोर्ट्रेट आहे, त्याची निवड करायचं पक्कं झालं, असं महेश लाड यांनी सांगितलं.

राष्ट्रपतींना भेट दिलेल्या महाराजांच्या प्रतिमेत सोन्याचे कण मढवण्यात आलेत, म्हणजे ही प्रतिमा सुवर्णजडित आहे. तसंच यात काही इतर उच्च दर्जाच्या स्टोन्सचाही वापर करण्यात आला आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Artist Mahesh Lad feels grateful as President Ramnath Kovind feels honored by Shivaji Maharaj portrait latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV