गायिका नाहिद आफरीनविरोधात 46 आसामी मुल्लांचा फतवा

By: | Last Updated: > Friday, 17 March 2017 1:23 PM
गायिका नाहिद आफरीनविरोधात 46 आसामी मुल्लांचा फतवा

गुवाहाटी : ‘इंडियन आयडल ज्युनिअर’ या सोनी टीव्हीवरील रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली गायिका नाहिद आफरीनविरोधात फतवा काढण्यात आला आहे. आयएस दहशतवादाच्या विरुद्ध आपल्या गाण्याच्या माध्यमातून एल्गार काढणाऱ्या नाहिदविरोधात 46 आसामी मुल्लांनी फतवा काढला आहे.

2015 मधील ‘इंडियन आयडल ज्युनिअर’च्या पर्वात उपविजेत्या ठरलेल्या 16 वर्षांच्या नाहिदने नुकतंच एका जाहीर कार्यक्रमात आयएस विरोधात सूर आळवले. याचीच प्रतिक्रिया म्हणून हा फतवा काढला आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. मध्य आसाममधील होजाई आणि नागाव जिल्ह्यात फतव्याची पत्रकं काढण्यात आली आहेत.

काय आहे फतवा?

’25 मार्चला आसामच्या लंका भागातील ‘उदाली सोनाई बिबी कॉलेज’मध्ये नाहिद ही गायिका शरियाच्या विरोधात गाणं गाणार आहे. मस्जिद, इदगाह, मदरसे आणि स्मशानभूमीने वेढलेल्या कॉलेजच्या या मैदानात शरिया-विरोधी म्युझिकल नाईट आयोजित करण्यात आली तर आपल्या भविष्यातील पिढ्यांच्या मनात अल्लाविषयी राग निर्माण होईल.’ असं या फतव्यात म्हटलं आहे.

16 वर्षांची नाहिद आफरीन दहावीची विद्यार्थिनी असून आसामच्या बिश्वनाथ चरियाली भागात राहते. आपल्याविरोधात काढलेल्या फतव्यामुळे तिला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. ‘मी निशब्द झाली आहे. संगीत ही माझ्यासाठी देवाची देणगी आहे. त्यामुळे मी अशा धमक्यांना भीक घालणार नाही, त्याच्यापुढे झुकणार नाही. माझं गाणं कधीच सोडणार नाही.’ असं नाहिद म्हणते.

कार्यक्रमाच्या आयोजकांनीही मैफल रद्द करण्यास नकार दिल्याचं नाहिदच्या आईने सांगितलं आहे. नाहिद आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याची हमी पोलिसांनी दिली आहे. 2016 मध्ये सोनाक्षी सिन्हाची भूमिका असलेल्या ‘अकिरा’ चित्रपटासाठी पार्श्वगायन करुन तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017 1.    बारावीच्या निकालाची तारीख

पीएफसाठी पगारातून 12 ऐवजी 10 टक्के रक्कम कटणार?
पीएफसाठी पगारातून 12 ऐवजी 10 टक्के रक्कम कटणार?

पुणे : प्रॉव्हिडेंट फंड अर्थात पीएफच्या बाबतीत ईपीएफओ एक महत्वाचा

लष्कराच्या कारवाईत ठार झालेला सबजार अहमद कोण?
लष्कराच्या कारवाईत ठार झालेला सबजार अहमद कोण?

जम्मू-काश्मीर: सबजार अहमद भट्ट… बुरहान वानीचा उत्तराधिकारी,

रावणाचा वध कुणी केला?
रावणाचा वध कुणी केला?

मुंबई : रावणाचा वध रामाने केला, हाच इतिहास आतापर्यंत सांगितला जात

मोदी-नितीश... ये रिश्ता क्या कहलाता हैं!
मोदी-नितीश... ये रिश्ता क्या कहलाता हैं!

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलावलं तर ते आले

‘साबण, शॅम्पूने आंघोळ करा मगच योगींसमोर या’, अधिकाऱ्यांचा फतवा
‘साबण, शॅम्पूने आंघोळ करा मगच योगींसमोर या’, अधिकाऱ्यांचा फतवा

कुशीनगर : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या

लष्कराच्या कारवाईत बुरहान वानीचा उत्तराधिकारी सबजार अहमदचा खात्मा
लष्कराच्या कारवाईत बुरहान वानीचा उत्तराधिकारी सबजार अहमदचा...

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीपच्या रामपूर सेक्टरमधून घुसखोरी

निवडणूक आयोगाच्या हॅकेथॉनसाठी केवळ राष्ट्रवादीचा अर्ज
निवडणूक आयोगाच्या हॅकेथॉनसाठी केवळ राष्ट्रवादीचा अर्ज

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाचं ईव्हीएम हँकिंग चँलेंज

रिपोर्ट कार्ड : निराशाजनक कामगिरी असणारे मोदी सरकारमधील पाच मंत्री
रिपोर्ट कार्ड : निराशाजनक कामगिरी असणारे मोदी सरकारमधील पाच मंत्री

नवी दिल्ली : अच्छे दिनचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला तीन

नितीन गडकरी अव्वल, मोदी सरकारचे टॉप पाच मंत्री
नितीन गडकरी अव्वल, मोदी सरकारचे टॉप पाच मंत्री

नवी दिल्ली : अच्छे दिनचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला तीन