ठाण्यासह देशभरातून चार दहशतवादी, पाच संशयित ATS च्या ताब्यात

ठाण्यासह देशभरातून चार दहशतवादी, पाच संशयित ATS च्या ताब्यात

मुंबई : मुंबई, बिजनौर आणि लुधियानातून पाच दहशतवाद्यांना, तर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. पाच राज्यांच्या पोलिसांच्या मदतीनं एटीएसनं ही कारवाई केली.

ठाण्यातील मुंब्रा भागातून नाजिम शमशाद अहमद नावाच्या एका 26 वर्षीय दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. नाजिम हा मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी आहे. मात्र 2014 पासून तो मुंब्य्राच्या देवरी पाडा परिसरात भाड्याच्या घरात राहत होता.

मुंब्य्रातूनच गुलफाम आणि उजैफा अबरार या आणखी दोन संशयित दहशतवाद्यांनाही एटीएसनं ताब्यात घेतलं. नाजिमचे घरमालक गावी गेल्यामुळे उत्तर प्रदेशातूनच आलेले गुलफाम आणि उजैफा 5 एप्रिलपासून त्याच्या घरी राहायला आले. ते दोघे आपले नातेवाईक असल्याची माहिती नाजिमने शेजाऱ्यांना दिली होती.

हे दहशतवादी घातपात घडवण्याचा कट रचत असून काही तरुणांचं ब्रेनवॉश करत असल्याची माहिती पाच राज्यांच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब आणि बिहारच्या पोलिसांच्या मदतीनं 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या सर्व दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे.

 

 

 

 

 

 

First Published:

Related Stories

बिहारमध्ये धावत्या बसला आग, 8 जणांचा होरपळून मृत्यू
बिहारमध्ये धावत्या बसला आग, 8 जणांचा होरपळून मृत्यू

नालंदा (बिहार): बिहारच्या नालंदामध्ये धावत्या बसनं पेट घेतल्याची

बाबरी प्रकरण : अडवाणी, जोशी आणि भारतींना हजर राहण्याचे आदेश
बाबरी प्रकरण : अडवाणी, जोशी आणि भारतींना हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली : बाबरी मशीद प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण

पाकिस्तान 'मौत का कुआं', भारतासारखा दुसरा देश नाही: उज्मा
पाकिस्तान 'मौत का कुआं', भारतासारखा दुसरा देश नाही: उज्मा

नवी दिल्ली: पाकिस्तानात ‘अडकलेली’ उज्मा अखेर आज (गुरुवार) भारतात

पोलीस पत्नीची हत्या मुलाकडूनच, जोधपूरमधून सिद्धांतला अटक
पोलीस पत्नीची हत्या मुलाकडूनच, जोधपूरमधून सिद्धांतला अटक

जोधपूर: मुंबईतील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्यी पत्नी

कुलभूषण यांचं इराणमधून अपहरण, ISI च्या माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट
कुलभूषण यांचं इराणमधून अपहरण, ISI च्या माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडावर आपटल्यानंतर

ब्रम्हपुत्रेच्या काठावर देशातला सर्वात मोठा पूल उद्घाटनासाठी सज्ज
ब्रम्हपुत्रेच्या काठावर देशातला सर्वात मोठा पूल उद्घाटनासाठी...

नवी दिल्ली : एखाद्या नदीवर बांधलेला पूल जास्तीत जास्त किती लांबीचा

सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी, सर्वोच्च पातळी गाठली!
सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी, सर्वोच्च पातळी गाठली!

मुंबई: मुंबई शेअर बाजाराने आज ऐतिहासिक टप्पा गाठला. 456 अंकांनी उसळी

कारवर दरोडा, महिलांवर गँगरेप करुन एकाची हत्या
कारवर दरोडा, महिलांवर गँगरेप करुन एकाची हत्या

ग्रेटर नोएडा : 2016 मध्ये बुलंदशहर हायवेवर झालेल्या गँगरेपच्या घटनेची

आयकर विभागाकडून 600 कोटीची संपत्ती जप्त, 400 बेनामी व्यवहारांचा छडा
आयकर विभागाकडून 600 कोटीची संपत्ती जप्त, 400 बेनामी व्यवहारांचा छडा

नवी दिल्ली : काळ्या पैशांविरोधातील कारवाईत आयकर विभागाच्या हाती

तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांचा हेडफोन्सवर डल्ला
तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांचा हेडफोन्सवर डल्ला

मुंबई : मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या सुपरफास्ट, हायटेक तेजस