'प्रदूषण होतं म्हणून चिता दहनाविरोधातही याचिका टाकतील'

'कधी दही हंडी, आज फटाके उद्या असं होईल की, प्रदूषण होतं म्हणून मेणबत्ती आणि पुरस्कार वापसी गँग हिंदूंच्या चिता दहनाविरोधातही याचिका दाखल करतील.'

'प्रदूषण होतं म्हणून चिता दहनाविरोधातही याचिका टाकतील'

आगरतळा : फटाकेबंदीच्या निर्णयानंतर याविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. कुणी या निर्णयाचं समर्थन केलं आहे तर कुणी या निर्णयबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याच वादात आता त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनीही उडी घेतली आहे.

याबाबत तथागत रॉय यांनी एक ट्वीट केलं आहे. 'कधी दही हंडी, आज फटाके उद्या असं होईल की, प्रदूषण होतं म्हणून मेणबत्ती आणि पुरस्कार वापसी गँग हिंदूंच्या चिता दहनाविरोधातही याचिका दाखल करतील.'एकीकडे आधीच याबाबत वाद-विवाद सुरु असताना खुद्द राज्यपालांनी अशा पद्धतीचं ट्वीट केल्यानं आता याविषयी आणखी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, याआधी काही जणांनी देखील या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

याआधी चेतन भगत याने देखील या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. 'फक्त  हिंदू सणांबाबतच असे नियम का? बकऱ्याचा बळी, मोहरमच्या पालख्यांवर बंदी लावण्यात येईल? फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे जसं की, ख्रिसमस ट्री शिवाय ख्रिसमस आणि बकऱ्याच्या बळीशिवाय बकरी ईद.'

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

राजधानी दिल्लीत यावर्षी विनाफटाक्यांची दिवाळी साजरी होणार आहे. फटाके विक्रीवर गेल्या वर्षी घालण्यात आलेली बंद सुप्रीम कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. पोलिसांनी दिलेले सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.

यावर्षी 12 सप्टेंबर रोजी देण्यात आलेला आदेश 1 नोव्हेंबारपासून लागू होणार आहे. या आदेशामध्ये दिल्ली एनसीआरमध्ये काही अटींसह फटाके विक्रीला परवानगी देण्यात आली होती. मात्र आता या नव्या आदेशामुळे विक्रेत्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री करता येणार नाही.

यावर्षी फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर प्रदूषण कमी होतं का, हे पाहणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. वाढतं प्रदूषण पाहता गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर बंदी घातली होती.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV