अॅक्सिस बँकेचं ‘फुल ऑफ फन’, एटीएममधून ‘चिल्ड्रन बँके’ची नोट

कानपूरच्या मार्बल मार्केटमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ची 500 रुपयांची नोट बाहेर आली.

अॅक्सिस बँकेचं ‘फुल ऑफ फन’, एटीएममधून ‘चिल्ड्रन बँके’ची नोट

कानपूर (उत्तर प्रदेश)  : लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा एटीएममधून आल्या तर…? थोडं आश्चर्यकारक वाटेल, पण कानपूरमध्ये हे घडलं आहे. कानपूरच्या मार्बल मार्केटमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ची 500 रुपयांची नोट बाहेर आली.

सचिन नामक व्यक्तीने अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून 10 हजार रुपयांची कॅश काढली. त्यात एक नोट बनावट होती. त्या नोटेवर ‘रिझर्व्ह बँक ऑ इंडिया’च्या ऐवजी ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे छापले होते, शिवाय ‘फुल ऑफ फन’ असेही त्या नोटेवर छापण्यात आले होते. लहान मुलांच्या खेळण्यात ज्या नोटा असतात, त्यातली ही नोट होती.

Axix ATM 1 (PHOTO : ANI)

मी एटीएम गार्डकडे यासंदर्भात तक्रार केली असून, त्यांनी सोमवारपर्यंत नोट बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय, यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात आल्याचे सचिन यांनी सांगितले.

“अॅक्सिस बँकेच्या याच एटीएममधून दोन जणांनी पैसे काढले. एकाने 20 हजार, तर दुसऱ्याने 10 हजार रुपये. दोघांनाही 500 रुपयांची एक-एक नोट बनावट मिळाली, जिच्यावर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया छापले होते. हे एटीएम आता बंद करण्यात आले असून, तपास सुरु करण्यात आला आहे.” असे. दक्षिण कानपूरचे पोलिस अधिक्षकांनी सांगितले.

एटीएम बंद करण्यात आले असले, तरी अॅक्सिस बँकेसारख्या मोठ्या बँकेकडून इतका गंभीर हलगर्जीपणा कसा होऊ शकतो, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Axis Bank ATM located in Kanpur dispensed fake currency notes
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV