ताजमहल वादावरुन आझम खान यांचंही वादग्रस्त विधान

'मी आधीही म्हटलं होतं की, ताजमहलच का? संसद, राष्ट्रपती भवन, कुतुबमिनार या देखील गुलामीपणाच्या निशाण्या आहेत. त्या वास्तू देखली पाडल्या पाहिजेत.'

ताजमहल वादावरुन आझम खान यांचंही वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहलबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी या वक्तव्याला उत्तर देताना त्यांनीही वादग्रस्त विधान केलं आहे.

याबाबत बोलताना आझम खान म्हणाले की, 'मी आधीही म्हटलं होतं की, ताजमहलच का? संसद, राष्ट्रपती भवन, कुतुबमिनार या देखील गुलामीपणाच्या निशाण्या आहेत. त्या वास्तू देखली पाडल्या पाहिजेत. आम्ही तर आवाहन करतो की, पहिला हातोडा तुम्ही मारा, दुसरा आम्ही मारु. पण एकदा त्याबाबत बोलून पुन्हा मागे हटणं हे राजकीयदृष्ट्या चुकीचं आहे.'

आम्ही हा इतिहास बदलू: संगीत सोम

संगीत सोम म्हणाले, “आपण कोणत्या इतिहासाबद्दल बोलत आहोत?  ताजमहलचा निर्माता – शाहजहाँने स्वत:च्या वडिलांना कैद केलं होतं. त्याला हिंदू धर्म संपवायचा होता. जर हे आपल्या इतिहासाचे भाग असतील, तर ही आपल्यासाठी दुर्भाग्याची भाग आहे. आम्ही हा इतिहास बदलू”

ओवेसींचा पलटवार

संगीत सोम यांच्या या वक्तव्यानंतर MIM खासदार असदुद्दीन ओवेसींनी पलटवार केला. जर असं असेल तर लाल किल्लाही गद्दारांचं निशाण आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवणार का, असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला.

ओवेसींनी ट्विट करुन, दिल्लीत हैद्राबाद हाऊसही ‘गद्दार’ने बनवलं होतं. त्यामुळे मोदी परदेशी पाहुण्यांना इथे येण्यापासून रोखतील? गद्दारांनीच लाल किल्ला उभारला होता, तिथून तिरंगा फडकावणं बंद करणार का? असे सवाल उपस्थित केले आहेत.

संबंधित बातम्या :

ताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील डाग: भाजप आमदार


 

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV