ताजमहालमध्ये नमाज बंद करा किंवा शिवपूजेला परवानगी द्या : आरएसएस

ताजमहालसमोर होणार नमाज पठण बंद करावं नाहीतर हिंदूना शिवपूजा करु द्यावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांन केली आहे.

ताजमहालमध्ये नमाज बंद करा किंवा शिवपूजेला परवानगी द्या : आरएसएस

नवी दिल्ली : जगातलं सातवं आश्चर्य म्हणजेच ताजमहालसमोर होणार नमाज पठण बंद करावं नाहीतर हिंदूना शिवपूजा करु द्यावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांन केली आहे. आरएसएसच्या अखिल भारतीय इतिहास संकलन समितीची बालमुकुंद पांडे यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही वादग्रस्त मागणी केली आहे.

ताजमहाल हे हिंदू राजानं बांधलेलं शिवमंदिर असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. शाहजहाननं मुमताजच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांतच दुसरं लग्न केलं, त्यामुळं ताजमहाल हे प्रेमाचं प्रतिक नसल्याचा दावाही पांडे यांनी केला आहे.

'आम्ही आणखीही पुरावे गोळा करण्याचं काम करत आहोत. हे सर्व पुरावे आम्ही लवकरच सर्वांसमोर आणू.' असा दावाही पांडे यांनी केला आहे. दरम्यान, नमाज पठणामुळे ताजमहाल शुक्रवारी काही काळ बंद ठेवलं जातं.

आरएसएसनं घेतलेल्या या भूमिकेमुळे आता ताजमहालबाबतचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ban namaz at Tajmahal or allow shiva prayers RSS demands latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV