दिल्लीतील फटाके विक्रीवरील बंद कायम!

दिल्लीत फटाके विक्रीवर गेल्या वर्षी घालण्यात आलेली बंद सुप्रीम कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. पोलिसांनी दिलेले सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.

दिल्लीतील फटाके विक्रीवरील बंद कायम!

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत यावर्षी विनाफटाक्यांची दिवाळी साजरी होणार आहे. फटाके विक्रीवर गेल्या वर्षी घालण्यात आलेली बंद सुप्रीम कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. पोलिसांनी दिलेले सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.

यावर्षी 12 सप्टेंबर रोजी देण्यात आलेला आदेश 1 नोव्हेंबारपासून लागू होणार आहे. या आदेशामध्ये दिल्ली एनसीआरमध्ये काही अटींसह फटाके विक्रीला परवानगी देण्यात आली होती. मात्र आता या नव्या आदेशामुळे विक्रेत्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री करता येणार नाही.

यावर्षी फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर प्रदूषण कमी होतं का, हे पाहणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. वाढतं प्रदूषण पाहता गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर बंदी घातली होती.

1 नोव्हेंबरपासून या अटींवर फटाके विक्री

  • अग्नी सुरक्षा नियमांचं पालन

  • ध्वनी प्रदूषण नियमांचं पालन

  • नो नॉईस झोन म्हणजे रुग्णालय, शाळा-महाविद्यालये, न्यायालय परिसरात 100 मीटरवर फटाके विक्री होऊ नये याबाबत प्रशासनाने काळजी घ्यावी

  • किरकोळ फटाका विक्रेत्यांना देण्यात आलेल्या तात्पुरत्या परवान्यांची संख्या निम्म्याने कमी करावी

  • मोठ्या व्यवसायिकांच्या कायमस्वरुपी परवान्यावरील बंदी उठवली. यावर्षीच्या प्रदूषणावर आधारित पुन्हा पडताळणी होणार

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV