पेट्रोल, डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होणार

1 जुलै ते 20 सप्टेंबर दरम्यान पेट्रोलच्या दरात सुमारे 7.43 रुपयांची वाढ झाली.

पेट्रोल, डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होणार

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी घटवल्याने दर सुमारे 2 रुपयांनी स्वस्त होतील. 4 ऑक्टोबरपासून बदल लागू केला जाणार आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. 1 जुलै ते 20 सप्टेंबर दरम्यान पेट्रोलच्या दरात सुमारे 7.43 रुपयांची वाढ झाली. प्रत्येक शहरांनुसार ही वाढ कमी-जास्त होती.

अमेरिकेतील दोन भयंकर वादळांमुळे कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचे कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले होते. मात्र आधीच दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या जनतेला अमेरिकेतील वादळाचे कारण पुढे केल्याने, त्यांना आणखी तीव्र टीकेला सामोरं जावं लागलं.

जागतिक स्तरावर रिफायनरींच्या क्षमतेत 13 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यात पेट्रोलच्या आंतरराष्ट्रीय दरात 18 टक्क्यांची, तर डिझेलच्या आंतरराष्ट्रीय दरात 20 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे भारतातही पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेले पाहायला मिळाले.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Diesel petrol डिझेल पेट्रोल
First Published:
LiveTV