भूसंपादनाला विरोधासाठी घरासमोर फास लटकवले!

सध्या भूसंपादनाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे.

भूसंपादनाला विरोधासाठी घरासमोर फास लटकवले!

बेळगाव : सुपिक शेतजमिनीचे संपादन केले तर काय करायचे, ही काळजी कणबर्गी परिसरातील शेतकऱ्यांना पडली आहे. त्यामुळे या भूसंपादनाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनोख्या प्रकारे आंदोलन केले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या घराच्या दर्शनी भागातच चक्क फास तयार करुन लावले आहेत. रामा डसका, इराप्पा अष्टेकर, पुंडलिक अष्टेकर अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.

बेळगावला लागूनच असलेल्या कणबर्गी गावच्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. अलीकडेच बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे काँग्रेसचे आमदार फिरोज सेठ यांनी स्वीकारल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया गतीमान झाली आहे.

सध्या भूसंपादनाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. भूसंपादनाला विरोध करण्यासाठी कणबर्गी येथे 9 तारखेला आंदोलन छेडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: belgaon farmers opposed land acquisition latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV