ब्रेक घेत गँगरेप नाही, सहमतीने दोघांशी सेक्स, डॉक्टरचा अहवाल

तक्रार दाखल झाल्यानंतर केलेल्या पहिल्या वैद्यकीय अहवालात तिने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचं म्हटलं होतं.

ब्रेक घेत गँगरेप नाही, सहमतीने दोघांशी सेक्स, डॉक्टरचा अहवाल

भोपाळ : गेल्या आठवड्यात भोपाळमध्ये युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने अवघा देश हादरला होता. मात्र पीडितेवर गँगरेप झाला नसून दोन आरोपींशी तिने सहमतीने सेक्स केलं, असा धक्कादायक वैद्यकीय अहवाल देण्यात आला. त्यानंतर, हा अहवाल एका ज्युनिअर डॉक्टरची चूक असल्याचं सांगत सारवासारव करण्यात आली आहे.

ज्युनिअर डॉक्टरच्या नावावर बिल फाडत भोपाळमधील सरकारी रुग्णालयाने हात झटकले आहेत. संबंधित अहवालातील चूक तात्काळ सुधारण्यात आली, असंही सुलतानिया रुग्णालयाचे अधीक्षक करण पीपरे यांनी सांगितलं.

31 ऑक्टोबर रोजी चार नराधमांनी 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे चहा, गुटखा, सिगरेटसाठी ब्रेक घेऊन आरोपींनी पीडितेवर तीन तास अत्याचार केला.

महत्त्वाचं म्हणजे पीडित तरुणीचे वडील पोलीस उपनिरीक्षक (PSI) तर आई गुन्हे अन्वेषण विभागात (CID) कार्यरत आहे.

आयपीएसचा अभ्यास करणारी पीडित विद्यार्थीनी कोचिंग क्लासवरुन परत येत होती. त्यावेळी चार नराधमांनी हबीबगंज रेल्वे स्टेशनजवळून तिचं अपहरण केलं. तिला ट्रॅकजवळ निर्जन स्थळी नेऊन एका ब्रिजखाली तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

टी-सिगरेट ब्रेक घेत, चार नराधमांकडून तीन तास बलात्कार!


पीडित तरुणी कशीबशी पोलीस स्टेशनला पोहोचली, मात्र इथेही पोलिसांनी तिला हद्दीवादावरुन नागवलं. तीन पोलीस स्थानकांनी हा भाग आमच्या हद्दीत नसल्याचं कारण देत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एका पोलिस अधिकाऱ्याने तर ही स्टोरी फिल्मी असल्याचा टोमणा मारला.

एफआयआर दाखल करण्यात 11 तासांचा विलंब केल्याने दहा पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं असून तिघांची बदली करण्यात आली आहे.

पोलिस असलेल्या आई-वडिलांनीच दोघा आरोपींची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी सूत्रं हलवली. गोलू चाधर, अमर, राजेश आणि रमेश अशी या नराधमांची नावं आहेत. या चारही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे गोलू हा स्त्रीभ्रूण हत्येतीतीलही आरोपी असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर केलेल्या पहिल्या वैद्यकीय अहवालात तिने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचं म्हटलं होतं.

'ही चूक आहे, पण ती दुरुस्त करण्यात आली आहे. भविष्यात वरिष्ठ महिला डॉक्टर आणि तिची टीम अशा संवेदनशील प्रकरणात चौकशी करेल, असे आदेश आम्ही दिले आहेत' असंही सुलतानिया रुग्णालयाचे अधीक्षक करण पीपरे यांनी सांगितलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bhopal Gang Rape Survivor had Consensual Sex, says Junior Doctor’s Report latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV