बेगूसरायमध्ये गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू

त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त बेगुसरायच्या सिमरिया घाटावर आज पुजेसाठी आणि स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला.

बेगूसरायमध्ये गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू

बेगुसराय (बिहार) : कार्तिक पौर्णिमेनिमित्त बिहारमधील बेगुसराय इथल्या घाटावर गंगास्नान करताना चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांचा समावेश आहे.

त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त बेगुसरायच्या सिमरिया घाटावर आज पुजेसाठी आणि स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यात तीन वृद्ध महिलांचा बळी गेला. तर जखमींची संख्याही मोठी आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर इतर भाविकांसह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरु केलं. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दुसरीकडे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या दुर्घटनेसाठी जिल्हा प्रशासनाला दोषी ठरवत, नितीश सरकारने याची जबाबदारी घ्यायला हवी, असं म्हटलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bihar : Stampede in Begusarai during kartik purnima celebrations, three dead
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV