बिहारमधील महाबोधी मंदिराजवळ जिवंत बॉम्ब सापडले!

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा थांबलेल्या ठिकाणापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हे बॉम्ब सापडले आहेत.

बिहारमधील महाबोधी मंदिराजवळ जिवंत बॉम्ब सापडले!

 

बोधगया (बिहार) : बिहारच्या बोधगयामध्ये महाबोधी मंदिराजवळ बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. परंतु वेळीच बॉम्ब निकामी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी थाळीच्या आकाराचे एकूण दोन बॉम्ब पोलिसांनी हस्तगत केले.

महाबोधी मंदिराजवळच्या कालचक्र मैदानाजवळ एका थर्मासमध्ये हे बॉम्ब आढळून आले. दरम्यान, तिबेटी धर्मगुरु दलाई लामा सध्या बोधगयामध्येच असल्याने पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे.

lama

धक्कादायक म्हणजे दलाई लामा थांबलेल्या ठिकाणापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हे बॉम्ब  सापडले आहेत. दलाई लामा हे येथे येणार असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, तरीही दोन बॉम्ब सापडल्यानं येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरम्यान, 2013 साली महाबोधी मंदिराजवळ सीरियल ब्लास्ट झाले होते. त्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाले होते. त्या घटनेनंतर महाबोधी मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा एकदा याच ठिकाणी बॉम्ब सापडल्यानं मोठी खळबळ माजली आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bihar two explosive found outside mahabodhi temple in bodhgaya latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV