जन्मदिन विशेष : अटल बिहारी वाजपेयींबद्दल 10 रंजक गोष्टी

अटल बिहारी वाजपेयी गेल्या मोठ्या कालावधीपासून राजकीय जीवनापासून दूर आहेत. ते आता 93 वर्षांचे आहेत. त्यामुळे वृद्धापकाळामुळे ते आजारीही असतात.

जन्मदिन विशेष : अटल बिहारी वाजपेयींबद्दल 10 रंजक गोष्टी

मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ देशाच्या पंतप्रधानपदी तीनवेळा विराजमान झाले नाहीत, तर एक जिंदादिल राजकारणी म्हणूनही आपलं व्यक्तिमत्त्व लोकांसमोर ठेवलं. वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्व अशा अनेक गोष्टींनी त्यांचं आयुष्य बनलं आहे.

अटल बिहारी वाजपेयी गेल्या मोठ्या कालावधीपासून राजकीय जीवनापासून दूर आहेत. ते आता 93 वर्षांचे आहेत. त्यामुळे वृद्धापकाळामुळे ते आजारीही असतात.

विशिष्ट पद्धतीची भाषणशैली आणि कवितांमुळेही प्रख्यात असणारे अटल बिहारी वाजपेयी आता फार बोलत नाहीत. लिहित नसले, बोलत नसले, तरी शरीराने मात्र आज वयाच्या 93 व्या वर्षीही अटलजींना चांगली साथ दिली आहे.

अटलजींच्या आयुष्याशी संबंधित 10 गोष्टी :

1. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेरमध्ये झाला. त्यावेळी भारत इंग्रजांच्या गुलामीत होता. त्यांचं जन्म ठिकाण म्हणजे ग्वाल्हेर हा आता मध्य प्रदेशचा भाग आहे. महात्मा गांधीजी काँग्रेसचे पहिले आणि शेवटचे अध्यक्ष बनले, त्याच दिवशी अटल बिहारी वाजपेयींचा जन्म झाला.

2. 1942 साली भारत छोडो आंदोलनावेळी अवघ्या भारतात स्वातंत्र्य संग्रामाचे वारे वाहू लागले होते, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसविरोधात आपलं अवघं राजकारण करणाऱ्या वाजपेयींनी सुरुवातीपासूनच आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. 1977 साली जनता पार्टीच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री बनले. 1996 साली पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर 1998 आणि 1999 मध्येही ते पंतप्रधान बनले. पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवसांचा होता. म्हणजे 16 मे 1996 ते 1 जून 1996. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यावेळी पंतप्रधानपदी ते 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 या कालावधीत राहिले.

3. अटल बिहारी वाजपेयींचं वैयक्तिक आयुष्यही अत्यंत रंजक आहे. राजकारणाच्या पलिकडचे अटल बिहारी वाजपेयी अत्यंत हळव्या मनाचे आहेत. कवी मनाचे आहेत. राजकारणाच्या चर्चांमध्ये दबक्या आवाजात त्यांच्या प्रेमाचीही चर्चा झाली. राजकुमारी कौल यांच्यावर त्यांचं प्रेम होतं आणि त्यांच्यासोबतही कौल राहिल्या. मात्र अटल बिहारी वाजपेयींनी कधीच जाहीरपणे हे सांगितले नाही. मात्र, 'मी अविवाहित आहे, पण ब्रम्हचारी नाही', असे सांगायला मात्र ते डगमगले नाहीत.

4. अटल बिहारी वाजपेयींना कुणी अपत्य नाही, मात्र त्यांनी नमिता कौल हिला दत्तक मुलगी मानलं, तिला सांभाळलं. नमिता कौल यांचं लग्न रंजन भट्टाचार्य यांच्याशी झालं.

5. अटल बिहारी वाजपेयी मूळचे ग्वाल्हेरचे. मात्र 1991 ते 2004 पर्यंत त्यांनी लखनऊचं लोकसभेत प्रतिनिधित्त्व केलं. वाजपेयी हे एकमेव काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षाचे पंतप्रधान आहेत, ज्यांनी पंतप्रधानपदाची 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण केली.

6. अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय नेत्यासोबतच कवीही आहेत. पंतप्रधान असताना त्यांचा एक कवितासंग्रही प्रकाशित झाला.

अटलजींच्या कवितेची ओळी :

"थ्वी लाखों वर्ष पुरानी, जीवन एक अनंत कहानी
पर तन की अपनी सीमाएं, यद्यपि सौ वर्षों की वाणी
इतना काफी है, अंतिम दस्तक पर खुद दरवाजा खोलो।"

7. अटल बिहारी वाजपेयीने 1998 मध्ये पंतप्रधान असताना पोखरण-2 अणूचाचणी केली. त्यांच्या काळात पाकिस्तानविरोधात कारगिल युद्धही झालं आणि त्यात भारताचा विजय झाला.

8. अटल बिहारी वाजपेयी हे एक उत्कृष्ट पंतप्रधान म्हणून नावाजले, मात्र त्याचसोबत उत्कृष्ट खासदार म्हणूनही त्यांचा अनेकदा गौरव झाला. संपूर्ण राजकीय कारकीर्दीत 10 वेळा लोकसभेत आणि दोनवेळा राज्यसभेत खासदार म्हणून निवडून गेले.

9. अटल बिहारी वाजपेयींच्या काही निर्णयांवर टीकाही झाली. गुजरात दंगलींनंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचं पालन करण्याची आठवण करुन देणे आणि नंतर त्या विधानावरुन त्यांनी यूटर्न घेतला. 1983 मध्ये आसाममधील नीलीमध्ये त्यांनी केलेल्या भाषणावरुनही त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.

10. अटल बिहारी वाजपेयींचं हिंदी भाषेवरील प्रेमही सर्वश्रुत आहे. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी संयुक्त राष्ट्रात हिंदीत भाषण केलं. संयुक्त राष्ट्रात हिंदीत भाषण करणारे ते पहिले परराष्ट्र मंत्री होते.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Birthday Special : 10 interesting things of Former PM Atal Bihari Vajpayee
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV