मतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला मतदारांकडून चपलांचा हार

मध्य प्रदेशच्या धारा जिल्ह्यात सध्या धामनोद नगरपालिका निवडणुकीत मतं मागायसाठी गेलेल्या भाजप उमेदवाराला नागरिकांनी चक्क चपलांचा हार घालून मारहाण केली. दिनेश शर्मा असे या भाजप उमेदवाराचे नाव आहे.

मतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला मतदारांकडून चपलांचा हार

धारा/ मध्यप्रदेश : मध्य प्रदेशच्या धारा जिल्ह्यात सध्या धामनोद नगरपालिका निवडणुकीत मतं मागायसाठी गेलेल्या भाजप उमेदवाराला नागरिकांनी चक्क चपलांचा हार घालून मारहाण केली. दिनेश शर्मा असे या भाजप उमेदवाराचे नाव आहे.

शर्मा सध्या आपल्या वॉर्डात डोअर-टू-डोअर निवडणूक कॅम्पेन राबवत आहेत. याच दरम्यान त्यांच्या वॉर्डातील एका भागात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण भाजपवर नाराज असलेल्या मतदारांनी शर्मांना चपलांचा हार घालून, आपला रोष व्यक्त केला.

या मतदारसंघातील नागरिक पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे.शर्मांच्या गळ्यात चपलांचा हार घालणाऱ्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं की, “गेल्या वेळेस वॉर्डातील महिला पाण्याची समस्या घेऊन वॉर्ड अध्यक्षांच्या घरी गेल्या होत्या. पण त्यांची पाण्याची समस्या सोडवण्याऐवजी, त्यांच्याविरोधातच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.”

यात त्यांच्या पत्नीचाही समावेश असल्याचे त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं. शिवाय, या तक्रारीनंतर त्या सर्वांना रात्री उशीरपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आल्याची माहिती त्या वृद्ध व्यक्तीने दिली.

दरम्यान, मध्य प्रदेशमधील धामनोर नगरपालिकेवर भाजपचाच दबदबा आहे. पण यंदाच्या निवडणुकीत नगरपालिका क्षेत्रातील नागरीक भाजपवर कमालीचे नाराज आहेत. त्यामुळे भाजपने अनेक ठिकाणी नवीन उमेदवार दिले आहेत.

पण तरीही मतदारांची नाराजी काही दूर झाली नाही. त्यामुळे मतं मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला चपलांचा हार घालून, नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bjp candidate dinesh sharma wear garland of shoes in mp
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV