मुलावरील आरोपांवर अमित शाह यांनी अखेर मौन सोडलं!

"स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात काँग्रेसवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. या प्रकरणात त्यांनी कधी अब्रूनुकसानीचा दावा केला का?" असा प्रश्न त्यांनी विचारला.

By: | Last Updated: > Friday, 13 October 2017 2:45 PM
BJP chief Amit Shah defends son Jay Shah on corruption allegations

अहमदाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच मुलगा जय शाह यांच्या कंपनीवरील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. एका न्यूज चॅनलशी बोलताना अमित शाह म्हणाले की, “जय यांच्या कंपनीने सरकारसोबत कोणताही व्यवहार केला नाही. कोणतीही सरकारी जमीन घेतलेली नाही आणि कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. हे भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही. जर काँग्रेसकडे या प्रकरणी पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टात सादर करावेत.”

उलट यावेळी अमित शाहांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात काँग्रेसवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. या प्रकरणात त्यांनी कधी अब्रूनुकसानीचा दावा केला का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

पुरावे असतील तर समोर यावं : शाह
“माझ्या मुलाने कोर्टात जाऊन 100 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणीही केली आहे. आमच्यावर आरोप झाले तर आम्ही 100 कोटींच्या मानहानीची केस दाखल केली. काँग्रेसवर एवढे आरोप लागले, त्यांनी किती जणांवर केस केली? जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर समोर यावं,” असं आव्हान अमित शाह यांनी दिलं आहे.

टर्नओव्हर आणि फायद्यात फरक
या संपूर्ण प्रकरणात विस्ताराने उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, “जयच्या कंपनीचा कमोडिटीज एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. 80 कोटींचा टर्नओव्हर झाला हे सांगत आहेत, पण फायदा किती झाला हे कोणीच सांगत नाही. पण टर्नओव्हर आणि फायदा यात फरत असतो, हे लक्षात घ्यायला हवं. 80 कोटींच्या टर्नओव्हरनंतर 1.5 कोटींचं नुकसानही झालं. तर पैशांची अफरातफर कशी झाली? सगळे व्यवहार बँक आणि चेकच्या माध्यमातून झाले. तसंच सगळे व्यवहार एक्सपोर्टचे आहेत. म्हणून कंपनीचा टर्नओवर जास्त आहे.”

अमित शाहांनी यावेळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेस घेरलं. “काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. अनेक नेत्यांविरोधात कोर्टात प्रकरणं सुरु आहे. तरीही काँग्रेस या नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी भाजपवर चुकीचे आरोप लावत आहे,” असंही शाह म्हणाले.

अमित शाहांवर आरोप काय?
‘द वायर’ या वेबसाईटच्या वृत्तानुसार, 2004 मध्ये अमित शाह यांचा मुलगा जय शाहने टेंपल इन्टरप्रायझेज नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह व्यवस्थापक बनल्या. 2013 पर्यंत कंपनीने विशेष कमाई केली नाही. पण केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर कंपनीचा टर्नओव्हर 80 कोटी रुपये झाला. एक वर्षात जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 16,000 टक्के वाढला.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:BJP chief Amit Shah defends son Jay Shah on corruption allegations
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

वाढत्या प्रदुषणामुळं 25 लाख भारतीयांचा मृत्यू!
वाढत्या प्रदुषणामुळं 25 लाख भारतीयांचा मृत्यू!

नवी दिल्ली : संपूर्ण देशात 2015 मध्ये जल, वायू आणि इतर प्रकारच्य़ा

देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा
देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा

नवी दिल्ली : देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा

‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’
‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’

मुंबई : भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम भोवतीचा फास घट्ट

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी
पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी

जम्मू काश्मीर : पंतप्रधान झाल्यापासून सीमेवर दिवाळी साजरी

फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप
फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप

कोलकाता : मुंबईत राहणाऱ्या महिलेने एका आयएएस अधिकाऱ्याविरोधात

हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या
हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या

पानिपत : हरियाणातील पानिपतमध्ये 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून

सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद
सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद

  सहारनपूर (उत्तर प्रदेश) : मुस्लिम पुरुष आणि महिलांनी सोशल

जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला कात्री
जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला...

मुंबई : दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टमध्ये

माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन
माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन

तामिळनाडू : मोदी सरकारच्या नोटाबंदीची स्तुती करणाऱ्या अभिनेता कमल