काँग्रेसचं निवडणूक चिन्ह रद्द करा: भाजपची मागणी

निवडणुकी दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निवडणूक चिन्हाचं प्रदर्शन करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे.

काँग्रेसचं निवडणूक चिन्ह रद्द करा: भाजपची मागणी

नवी दिल्ली: काँग्रेसचं हात हे निवडणूक चिन्ह रद्द करा अशी मागणी, भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत दिल्ली भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे.

निवडणुकी दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निवडणूक चिन्हाचं प्रदर्शन करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने काँग्रेसचं हात हे चिन्ह रद्द करावं, अशी मागणी उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

उपाध्याय यांनी याबाबत सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांची भेट घेतली.

याप्रकरणी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा उभारावा लागला तरीही मागे हटणार नाही, असा पवित्रा उपाध्याय यांनी घेतला.

हाताचा पंजा हा मनुष्याच्या शरिराचा एक भाग आहे. त्यामुळे निवडणुकी दिवशी तो प्रचाराच्या हेतूने दाखवणं नियमाचं उल्लंघन आहे. तो एक प्रचाराचा भाग आहे, असं उपाध्याय यांचं म्हणणं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP demands cancellation of congress Election Symbol
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV