आंदोलकांच्या खरेदीसाठी भाजपकडे 500 कोटींचं बजेट : हार्दिक पटेल

गुजरात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हार्दिक पटेलने आपला भाजपविरोध आणखी तीव्र केला आहे. हार्दिक पटेलला पाटीदार समाजाचा मोठा पाठिंबा आहे.

आंदोलकांच्या खरेदीसाठी भाजपकडे 500 कोटींचं बजेट : हार्दिक पटेल

गांधीनगर (गुजरात) : सत्तेविरोधात लढणाऱ्या आंदोलकांना खरेदी करण्यासाठी भाजपकडे 500 कोटींचं बजेट आहे, असा गंभीर आरोप गुजरातमधील युवा नेता हार्दिक पटेल याने केला आहे. हार्दिक पटेल हा गुजरातमधील पाटीदार समाजाचं नेतृत्त्व करतो.

"सत्तेविरोधात लढणाऱ्या आंदोलकांना खरेदी करण्यासाठी भाजपकडे 500 कोटींचं बजेट आहे. मला समजत नाही की, विकास केला आहे, तर खरेदी का?", असा आरोप करत हार्दिक पटेल याने भाजपला थेट इशारा दिला आहे की, "गुजरातमधील जनता इतकी स्वस्त नाही की, कुणी त्यांची खरेदी करावी. गुजरातमधील जनतेचा अपमान केला जात असून, जनता या अपमानाचा बदला घेईल."

Hardik Patel 1

"भाजपविरोधात केवळ मी नव्हे, गुजरातमधील 6 कोटी जनता लढत आहे. व्यापारी, शेतकरी, सर्व समाज आणि कामगार भाजपच्या हुकूमशाहीला कंटाळले आहेत.", असेही हार्दिक पटेल म्हणाला.

गुजरात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हार्दिक पटेलने आपला भाजपविरोध आणखी तीव्र केला आहे. हार्दिक पटेलला पाटीदार समाजाचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपचे धाबे दणाणले आहे.

संबंधित बातम्या :

नरेंद्र पटेलांपाठोपाठ निखिल सवानींचाही भाजपला राम राम

भाजपमध्ये येण्यासाठी मला एक कोटींची ऑफर : नरेंद्र पटेल

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV