काँग्रेसला धक्का, मेघालयमध्येही भाजप समर्थित सरकार

एनपीपी नेते कोनराड संगमा हे 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. एनडीएच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.

काँग्रेसला धक्का, मेघालयमध्येही भाजप समर्थित सरकार

नवी दिल्ली :  मेघालयमध्ये भाजप समर्थित सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनपीपी, स्थानिक पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने मेघालयमध्ये सरकार स्थापन केलं जाईल. एनपीपी नेते कोनराड संगमा हे 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. एनडीएच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.

ईशान्येकडील निवडणुकीत भाजपने त्रिपुरा आणि नागालँडमध्ये घवघवीत यश मिळवलं. मेघालयमध्ये केवळ 2 जागांवर यश मिळवता आलं. पण सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावं लागणार आहे. 60 पैकी 21 जागा घेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरीही मेघालयमध्ये एनडीएचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे.

सरकार स्थापनेसाठी कुणाकुणाचा पाठिंबा?

मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 30 ही मॅजिक फिगर आहे. त्यानुसार एनपीपी -19, भाजप-2, यूडीपी-6, एचएसपीडीपी-2, पीडीएफ-4 आणि एका अपक्ष उमेदवाराने पाठिंबा दिला आहे. एकूण सदस्यसंख्या 34 झाली आहे.

मेघालयमध्ये कुणाकडे किती जागा?

भाजप – 2

काँग्रेस – 21

यूडीपी – 6

एनपीपी – 19

अन्य - 11

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bjp is ready to form government in meghalaya says sources
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV