नोएडात भाजप नेत्याच्या कारवर अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू

नोएडात दिवसाढवळ्या मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानं आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

नोएडात भाजप नेत्याच्या कारवर अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू

नोएडा : नोएडामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा नेत्याच्या कारवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात स्थानिक भाजप नेते शिवकुमार यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे.

नोएडात दिवसाढवळ्या मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानं आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक भाजपा नेते शिवकुमार स्वतःच्या सुरक्षारक्षकांसमवेत जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा नेत्याच्या फॉर्च्युनर कारवर अंदाधुंद गोळीबार केला.

या हल्ल्यात भाजपा नेत्यासह त्या तिघांनाही गोळ्या लागल्या आहेत. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिवकुमार व त्याच्या दोन सुरक्षारक्षकांचा जागेवरच मृत्यू झाला.

दरम्यान, शिवकुमार यांच्यावरील हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पोलीस सध्या हल्लेखोरांचा कसून तपास करत आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP leader ShivKumar shot dead in Noida latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV