आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आलो, भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडेंनी भाजप राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आली असल्याचं वक्तव्य केलं आहे.

आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आलो, भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

बंगळुरु : केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडेंनी भाजप राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आली असल्याचं वक्तव्य केलं आहे. कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील कुकानूरमधील ब्राह्मण युवा परिषदेतच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

हेगडे म्हणाले की, “ राज्यघटनेनं आपल्या धर्मनिरपेक्ष म्हणण्याचा अधिकार दिला. पण याच राज्यघटनेत अनेकवेळा दुरुस्त्या करण्यात आल्या. आम्ही देखील याच दुरुस्त्या करण्यासाठी सत्तेत आलो आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “ज्या लोकांना आपल्या अस्तित्वाबद्दल पूरेशी माहिती नसते, ते स्वत: ला धर्मनिरपेक्ष म्हणवतात. त्यांची कोणतीही ओळख नसते. पण हेच लोक स्वत: ला बुद्धिजीवी म्हणवतात.”

हेगडेंच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हेगडेंच्या वक्तव्याचा समाचार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला. सिद्धरामय्या म्हणाले की, “हेगडेंनी राज्यघटना वाचली नाही. देशातला प्रत्येक नागरीक भारतीयच आहे. आणि प्रत्येक धर्माला समान अधिकार प्राप्त आहे. पण हेगडे त्यांना या मूलभूत अधिकारांबद्दलच माहिती नाही.”

दरम्यान, अनंत कुमार हेगडेंचं हे पहिलं वादग्रस्त वक्तव्य नाही. यापूर्वी देखील त्यांनी इस्लामबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कर्नाटकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तर नोव्हेंबरमध्ये त्यांनी कर्नाटक सरकारने आयोजित केलेल्या टीपू सुलतानच्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी टीपू सुलताना हा हिंदू विरोधी राजा असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नकार दिला होता.

संबंधित बातम्या

'त्या' डॉक्टरांना आम्ही गोळ्या घालू, हंसराज अहिरांचं वादग्रस्त वक्तव्य

टिपू सुलतानच्या जयंतीला हजर राहणार नाही, केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रानंतर नवा वाद

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: we are-here-to-change-constitution-says-minister-ananth-kumar-hegde
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV