भाजप खासदार वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

2019च्या लोकसभा निवडणुकांआधी वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

भाजप खासदार वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

नवी दिल्ली : भाजप खासदार वरुण गांधी लवकरच काँग्रेसवासी होण्याची चिन्हं आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकांआधी वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 2019 च्या निवडणुकीआधी गांधी घराण्यातील सर्व सदस्य लवकरच एकत्र येतील असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. यानंतर काँग्रेसच्या एका नेत्यानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

संजय गांधींचे सुपुत्र वरुण गांधींना भाजपमध्ये फारसे महत्व नसल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. वरुण गांधींना भाजपमध्ये फारसं महत्त्व दिलं जात नाही. पक्षात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. तसेच त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमताही आहे. पण भाजपमध्ये  त्यांना फारसं महत्व दिलं जात नाही. असं स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

उत्तर प्रदेशमधील एका काँग्रेस नेत्याच्या मते, प्रियंका गांधी आणि वरुण गांधी यांच्यात सुरुवातीपासूनच चांगले संबंध आहेत. त्यामुळे वरुण गांधींना काँग्रेसमध्ये आणण्यास प्रियंका मोठी भूमिका बजावू शकतात.

दरम्यान, एकीकडे ही चर्चा सुरु असली तरीही राहुल गांधी किंवा वरुण गांधी यांच्याकडून यासंबंधी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे वरुण गांधी भाजप सोडून काँग्रेसवासी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वरुण गांधी हे उत्तरप्रदेशच्या सुलतानपुरातून ते भाजपचे खासदार आहेत.

संबंधित बातम्या :

‘या’ तरुणांना राजकारणात 20 टक्के आरक्षण द्या : वरुण गांधी


भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP MP Varun Gandhi may join congress latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV