गुजरात निवडणुकीसाठी 36 उमेदवारांची भाजपची दुसरी यादी जाहीर

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कालच 70 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर, आज 36 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. पक्षाने आत्तापर्यंत 182 पैकी 106 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

By: | Last Updated: 18 Nov 2017 11:28 PM
गुजरात निवडणुकीसाठी 36 उमेदवारांची भाजपची दुसरी यादी जाहीर

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कालच 70 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर, आज 36 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. पक्षाने आत्तापर्यंत 182 पैकी 106 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

गुजरातच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 14 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून कोणीही नामांकन अर्ज दाखल केला नव्हता.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यातच भाजपने काल आणि आज असे एकूण 106 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण काँग्रेसकडून एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

 

संबंधित बातम्या

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bjp releases second list-of-36-candidates-for-gujarat-elections
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV