भाजप नेत्यांनी पाश्चिमात्य कपडे घालू नये : सुब्रमण्यम स्वामी

‘भाजपचे मंत्री आणि नेत्यांनी पाश्चिमात्य कपडे घालू नयेत. तसंच मद्यपान करु नये.’ त्यासाठी भाजपनं कार्यकर्ते, मंत्र्यांना सूचना द्याव्यात.’ अशी मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

भाजप नेत्यांनी पाश्चिमात्य कपडे घालू नये : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : ‘भाजपचे मंत्री आणि नेत्यांनी पाश्चिमात्य कपडे घालू नयेत. तसंच मद्यपान करु नये.’ त्यासाठी भाजपनं कार्यकर्ते, मंत्र्यांना सूचना द्याव्यात.’ अशी मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी दोन ट्विट केले आहेत.

सुब्रमण्यम  स्वामी यांच्या मते, 'वेस्टर्न कपडे हे परदेशी लोकांकडून आपल्यावर थोपवण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय वातावरणानुसारच सर्व मंत्र्यांनी अनुकूल असे कपडे परिधान करायला हवेत.' असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.दरम्यान, सुब्रमण्यम स्वामींनी याआधी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी देखील त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. पण आता पुन्हा एकदा त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे.

कायम वादग्रस्त मागणी करुन स्वामी चर्चेमध्ये असतात. आता त्यांनी भाजपमधील लोकांनी काय घालावं आणि काय प्यावं याची आचारसंहिता लागू करण्याची मागणी केली आहे. स्वामींच्या या मागणीवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं आहे.

संबंधित बातम्या :

पुढच्या दिवाळीपर्यंत अयोध्येत राम मंदिर उभे राहिल, सुब्रमण्यम स्वामींना विश्वास

गांधीहत्येबद्दल बोलायला स्वामी उभे राहिले, अन् विरोधकांचं ब्लड प्रेशर वाढलं!

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP should make it of party discipline for Ministers to wear Indian climate friendly clothes said Subramanian Swamy latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV