सत्ता आली, पण मोदींच्या जन्मगावात भाजपचा पराभव

मेहसाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. ज्यापैकी एक उंझा मतदारसंघ आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जन्मगाव असलेल्या वडनगरमध्ये आहे.

सत्ता आली, पण मोदींच्या जन्मगावात भाजपचा पराभव

अहमदाबाद : गुजरातमधील सत्ता राखण्यात भाजपला यश आलं. मात्र मेहसाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. मेहसाणा जिल्ह्यात उंझा विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघात वडनगर आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जन्मगाव  आहे.

याशिवाय शेजारच्या बेचराजीमध्येही भाजपचा पराभव झाला.

उंझा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आशा पटेल यांनी भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नारायण पटेल यांच्यावर 19 हजार मतांनी मात केली. 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत 79 वर्षीय नारायण पटेल यांनी 40 वर्षीय आशा पटेल यांचा पराभव केला होता.

याचप्रमाणे बेचराजी मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार भरत ठाकोर यांनी भाजपचे उमेदवार रजनीकांत पटेल यांचा 15 हजार 811 मतांच्या फरकाने पराभव केला. रजनीकांत पटेल 2012 सालच्या निवडणुकीत याच मतदारसंघातून आमदार होते.

या निवडणुकीत पाटीदार आंदोलन आणि ठाकोर समुदायाने काँग्रेसला कौल दिल्याने चित्र बदललं. उंझा मतदारसंघातील 2.12 लाख मतदारांपैकी 77 हजार पाटीदार समाज आहे, तर 50 हजार ठाकोर समुदाय आहे.

उंझा येथील उमिया माता मंदिर प्रसिद्ध आहे, जे पाटीदार समाजाचं कुलदैवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांनीही वडनगरमध्ये रॅली काढली होती. मात्र राहुल गांधींच्याच प्रचाराला या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळालं.

गुजरात विधानसभेतील पक्षीय बलाबल

  • भाजप - 99

  • काँग्रेस - 77

  • राष्ट्रवादी काँग्रेस - 1

  • भारतीय ट्रायबल पार्टी - 2

  • अपक्ष - 3


एकूण - 182

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bjp won Gujarat but loose in pm modi’s constituency
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV