लखनौत सहावीतील विद्यार्थिनीने पहिलीतल्या विद्यार्थ्याला भोसकलं

शाळा लवकर सुटावी, म्हणून विद्यार्थिनीने चिमुरड्याला भोसकल्याची धक्कादायक माहिती आहे.

लखनौत सहावीतील विद्यार्थिनीने पहिलीतल्या विद्यार्थ्याला भोसकलं

लखनौ : गुरुग्राममध्ये दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्नच्या हत्येची घटना ताजी असतानाच लखनौमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्याच शाळेच्या स्वच्छतागृहात पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं.

शाळा लवकर सुटावी, म्हणून विद्यार्थिनीने त्याला भोसकल्याची धक्कादायक माहिती आहे. आपल्यावर हल्ला करताना 'बॉयकटवाली दीदी' तसं म्हणाल्याचं सात वर्षीय विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटलं.

आरोपी असलेल्या 12 वर्षीय विद्यार्थिनीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. किंग जॉर्ज्स मेडिकल युनिव्हर्सिटीतील ट्रॉमा सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

विद्यार्थिनीचा फोटो पाहून जखमी विद्यार्थ्याने तिची ओळख पटवली.  'बॉयकटवाल्या दीदी'ने टॉयलेटमध्ये आपल्यावर चाकूने हल्ला केल्याचं त्याने सांगितलं. पोलिस संबंधित विद्यार्थिनीची कसून चौकशी करत आहेत.

लखनौमधील त्रिवेणीनगर भागातल्या ब्राईटलँड इंटरकॉलेज स्कूलच्या टॉयलेटमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला. शाळेने हा प्रकार मीडियाला सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांना या घटनेची माहिती न दिल्याबद्दल जिल्हा निरीक्षकांनी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Boy attacked with Knife in Lucknow School toilet, Class 6 Girl student suspect latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV