बुलेट ट्रेनचं तिकीट 250 ते 3,000 रुपये : NHSRCL

मुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी 250 ते 3000 रुपयांपर्यंत तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.

बुलेट ट्रेनचं तिकीट 250 ते 3,000 रुपये : NHSRCL

मुंबई : मुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी 250 ते 3000 रुपयांपर्यंत तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असून 2022 पर्यंत बुलेट ट्रेन सुरु होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी बुलेट ट्रेनच्या तिकीट दराबाबत माहिती दिली. पण हे दर सध्याच्या खर्चावर आधारित असल्याची माहिती त्यांनी दिली.

बुलेट ट्रेन तिकिटाचे संभाव्य दर

- मुंबई-अहमदाबाद - 3000 रुपये

- बीकेसी-ठाणे - 250 रुपये

- मुंबई-अहमदाबाद (बिजनेस क्लास) - 3000 रुपयांहून अधिक

- एका बुलेट ट्रेनमध्ये 10 डब्बे असतील. ज्यामध्ये एक बिजेनस क्लास असेल.

बुलेट ट्रेन प्रकल्पात 24 ट्रेन्स येणार आहेत. सुरुवातीला एक किंवा दोन बुलेट ट्रेन जपानमधून येतील. तर अन्य ट्रेन जपानच्या सहकार्याने भारतातच बनवण्यात येणार आहेत. दहा डब्यांच्या ट्रेनची आसन व्यवस्था 750 इतकी असेल. तर 16 डब्यांच्या गाडीत 1250 आसनं असतील.

2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.

कोणकोणत्या सुविधा

- उत्तम दर्जाची आसन व्यवस्था

- महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहं

- प्रवासी आजारी असल्यास आरामासाठी स्वंतत्र छोटी खोली.

- डब्यात सीसीटीव्ही, आपत्कालीन इंटरकॉम यंत्रणा

- स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा

- स्वयंचलित ब्रेक यंत्रणा

संबंधित बातम्या :

बुलेट ट्रेनला दिव्यात पहिला ब्रेक, जमीन देण्यास गावकऱ्यांचा विरोध











भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bullet train fares likely between rs 250 to rs 3000 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV