सी व्होटर सर्व्हे: मोदी पुन्हा लोकसभा जिंकणार

आजही देशात मोदींचा करिष्मा कायम असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे.

सी व्होटर सर्व्हे: मोदी पुन्हा लोकसभा जिंकणार

नवी दिल्ली:  लोकसभा निवडणुकीसाठी वर्ष-दीड वर्ष राहिले आहेत. मात्र आज देशाचा मूड काय हे सी व्होटरने जाणून घेतलं आहे. सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार आज निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा मोदींची सत्ता येऊ शकते.

आजही देशात मोदींचा करिष्मा कायम असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे.

पंतप्रधानपदासाठी 63 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. तर फक्त 13 टक्के लोकांनी राहुल गांधींना साथ दिली आहे.

त्यामुळे सध्या तरी देशात मोदींची जादू दिसतेय. खरं तर गुजरात निवडणुकीनंतर काँग्रेसला अच्छे दिन येतील अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेसला फारसं यश मिळतांना दिसत नाही. सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार काँग्रेसला फक्त 60 जागा मिळू शकतील. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 40 जागा मिळाल्या होत्या.

पंतप्रधानपदासाठी पहिली पसंती कोण?

 • नरेंद्र मोदी – 63%

 • राहुल गांधी – 13 %


आता लोकसभा निवडणुकी झाल्या तर कोणाला किती जागा?

 • भाजपप्रणित एनडीए – 335

 • काँग्रेसप्रणित यूपीए – 89

 • अन्य – 119


युती/आघाडीमध्ये कोणाला किती जागा?

 • एनडीए – 335 पैकी

 • भाजप – 279

 • यूपीए – 89 पैकी

 • काँग्रेस- 60


आता लोकसभा निवडणुकी झाल्या तर कोणाला किती मतं?

 • एनडीए-41%

 • यूपीए- 28 %

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: C-Voter survey for loksabha election 2018, Modi bests Rahul ,BJP repeats 2014 success
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV