माथेफिरु कारचालकाची पोलिसाला धडक, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

बनासकंठा येथील महामार्गावर पोलीस तपासणी सुरु होती. यावेळी एक कारचालक अतिशय वेगानं चेकनाक्याच्या दिशेनं आला. त्याला एका हेडकॉन्स्टेबलनं अडवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, या कारचालकानं गाडी थांबवण्याऐवजी थेट पोलिसाला उडवलं.

माथेफिरु कारचालकाची पोलिसाला धडक, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

बनासकंठा (गुजरात) : गुजरातमध्ये एक माथेफिरु कारचालकानं थेट पोलिसालाच धडक दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रस्त्यावर गाड्यांची तपासणी करणाऱ्या पोलिसाला उडवून माथेफिरु कारचालक फरार झाला आहे. गुजरातमधल्या बनासकांठा जिल्ह्यात घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

बनासकंठा येथील महामार्गावर पोलीस तपासणी सुरु होती. यावेळी एक कारचालक अतिशय वेगानं चेकनाक्याच्या दिशेनं आला. त्याला एका हेडकॉन्स्टेबलनं अडवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, या कारचालकानं गाडी थांबवण्याऐवजी थेट पोलिसाला उडवलं आणि तिथून फरार झाला.

या घटनेत हेडकॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर या माथेफिरुला शोधण्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

VIDEO :


 

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: car hit policeman in gujurat latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV