सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावीची परीक्षा 5 मार्चला सुरु होणार असून 4 एप्रिला संपणार आहे, तर बारावीची परीक्षा 5 मार्चला सुरु होऊन 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : सीबीएससी बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही वर्षांच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरु होणार आहेत.

दहावीची परीक्षा 5 मार्चला सुरु होणार असून 4 एप्रिला संपणार आहे, तर बारावीची परीक्षा 5 मार्चला सुरु होऊन 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन्ही परीक्षांचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

सीबीएसई दहावीचं संपूर्ण वेळापत्रक


दहावीला 16 लाख 38 हजार 552 विद्यार्थी बसले आहेत, तर 11 लाख 86 हजार 144 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा दहावीचा पहिला पेपर आहे, तर बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे.

सीबीएसई बारावीचं संपूर्ण वेळापत्रक


सीबीएसईच्या नियमांनुसार जानेवारी महिन्याच्या मध्यापासून सीबीएसई संलग्न शाळांमध्ये प्रयोग परीक्षांना सुरुवात होईल, त्या 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येतील.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: CBSE Class 10, 12 Board Exams From 5 March 2018 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV