पूजा सुरु असताना घरात बॉम्ब पडला, जम्मूत पाककडून गोळीबार

जम्मूतील अखनूर, आरएस पुरा आणि कानाचक भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.

पूजा सुरु असताना घरात बॉम्ब पडला, जम्मूत पाककडून गोळीबार

श्रीनगर:  पाकिस्तानने सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत, सीमेवर गोळीबार सुरुच ठेवला. काल रात्री पावणे आठच्या सुमारास पाकिस्तानकडून तुफान गोळीबार करण्यात आला.

जम्मूतील अखनूर, आरएस पुरा आणि कानाचक भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. सध्या गोळीबार थांबला आहे.

आतापर्यंत पाच जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोळीबार होत आहे. या गोळीबारात आतापर्यंत 7 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानसोबतच्या चकमकीत भारताचे सात जवान शहीद झाले आहेत.

 पाककडून बॉम्बस्फोट

पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर सीमाभागात सातत्याने गोळीबार सुरु आहे. त्यातच काही भागात बॉम्बस्फोटकही करण्यात आले.

धक्कादायक म्हणजे 45 वर्षीय विजय कुमार हे शुक्रवारी आपल्या घरी देवपूजा करत होते. त्यावेळी पाकिस्तानकडून आलेला एक बॉम्ब त्यांच्या घराचं छत तोडून आत पडला. मात्र त्या बॉम्बचा मोठा स्फोट झाला नाही. त्यामुळे परिसरात हा एकच विषय चर्चेचा होता.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ceasefire violation by Pakistan in Mendhar sector of Poonch Jammu And Kashmir
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV