सरकार आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवणार!

सुप्रीम कोर्टातील आधार अनिवार्यतेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं.

सरकार आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवणार!

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना, बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबरशी आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टातील आधार अनिवार्यतेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं.

केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी आधार लिंकिंगची डेडलाईन वाढवण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 होती. तर मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत वेळ देण्यात आला होता.

केंद्र सरकारने सर्व कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. याविरोधात सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. याबाबत पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.

''आधार कार्डच्या अनिवार्यतेवर आता बंदी आणता येणार नाही. कारण ही प्रक्रिया पुढे गेली असून अनेक वर्ष उलटले आहेत. केंद्र सरकार या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे'', अशी माहिती सुप्रीम कोर्टात अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिली.

संबंधित बातम्या :

आधार लिंकिंगच्या या चार डेडलाईन चुकवू नका!

मोबाईल आणि आधार लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा

आधार कार्ड लिंकसाठी मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका : सुप्रीम कोर्ट

सिम कार्ड- आधार कार्ड 6 फेब्रुवारीपर्यंत लिंक करा, अन्यथा मोबाईल बंद!

आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवली

बँक खात्याशी आधार लिंक न केल्यास काय होईल?

बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: center likely to extend aadhar mandatory deadline
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV